Shivanand Patil
Shivanand Patil Sakal
सोलापूर

Sugar Factory : गाळपाच्या शेवटपर्यंतचे ऊसबिल दामाजी वेळेत देणार - शिवानंद पाटील

हुकूम मुलाणी

संत दामाजी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात 15 नोव्हेंबर अखेर गळीतास आलेल्या ऊसाची उचल 2300 प्रमाणे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केले.

मंगळवेढा - संत दामाजी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात 15 नोव्हेंबर अखेर गळीतास आलेल्या ऊसाची उचल 2300 प्रमाणे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केले असुन, गळीतास आलेल्या ऊसाच्या शेवटच्या टनेजपर्यंतचे ऊस बिल वेळेत देणार असल्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी सांगीतले.

याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष पाटील म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी-सभासदांचा दामाजी कारखान्यावर विश्वास असल्यानेच चालू हंगामात 1 लाख 44 हजार 465 टनाचे गाळप करुन 1 लाख 35 हजार 750 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले.9.57 % सरासरी साखर उतारा असुन जिल्हयामध्ये दुस-या क्रमांकावर असून संचालक मंडळाने ठरविलेले गाळपाचे उद्षि्ठ सभासद-ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार यांच्या सहकाय्राने निश्चीतच पूर्ण करणार असल्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले. सदर प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर कारखान्याचे खातेप्रमुख विभागाप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

ब्रम्हपूरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, मुंढेवाडी, धर्मगांव, मल्लेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे, तांडोर, सिध्दापूर, बोराळे, नंदूर, अरळी, बालाजीनगर, डोणज, पाटखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी, गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर, खडकी, भोसे, हुन्नूर, महमदाबाद हू, रेवेवाडी, लोणार, पडोळकरवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रडडे, सिध्द्नकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, सिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगांव, देगांव, आंधळगांव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु, लवंगी, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी, सलगर खु, तसेच पंढरपुर, जत, मोहोळ, द सोलापुर, उ सोलापुर, कर्नाटक गेटकेन ऊसाची ॲडव्हान्स बिले धनश्री पतसंस्थेच्या विविध शाखांमध्ये, बठाण, उचेठाण, मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगांव, गुंजेगांव, लेंडवे चिंचाळे, कचरेवाडी, लक्ष्मी दहिवडी, अकोला, शेलेवाडी येथील शेतक-यांची ॲडव्हान्स बिले जिजामाता महिला नागरी बि शे पतसंस्था मंगळवेढा येथे तर सांगोला गेटकेनमधून गळीतास आलेल्या ऊसाची ॲडव्हान्स बिले रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा येथे वर्ग केल्याचे कार्यकारी संचालक श्री. सुनिल दळवी यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT