Sarpanch election in Mangalwedha taluka will be held on February 11 
सोलापूर

सरपंच निवडीसाठी घोडेबाजार सुरू; नंदेश्वरात सत्तेसाठी विरोधी गटाशी हात मिळवणी ?

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्यातील सरपंच निवड एकाच दिवशी 11 फेब्रुवारीला होणार असल्या तरी सत्तेसाठी फोडाफोडीच्या हालचालींनी वेग घेतला आहे.  त्यामध्ये नंदेश्‍वरातील घडामोडी निर्णायक वळणावर असून सत्ताधारी गटाने विरोधी गटाला जवळ करत त्यांचेही सदस्य अज्ञातस्थळी नेल्यामुळे सरपंच व उपसरपंच कोणत्या गटाचा होणार याची उत्सुकता लागून राहिली.

नुकत्याच झालेल्या 22 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काठावर सत्ता मिळवलेल्या सिध्दापूर, लवंगी, आसबेवाडी, बालाजी नगर, नंदेश्‍वर, डोणज, अरळी या गावात एका सदस्यामुळे सत्ता मिळाली. अरळी येथे चिठठी सदस्य सत्ता मिळाली तर बालाजी नगर येथे समसमान मते पडली आणि चिठठीमुळे सत्ता गमवावी लागली. त्यामुळे काठावर बहुमत मिळालेल्या गावात सत्तेसाठी विविध अस्त्राचा वापर सुरु केला आहे. गणेशवाडीचे सरपंचपद रिक्त राहणार आहे.

माचणूर, मरवडे, भोसे, लेंडवेचिंचाळे, बोराळे, हुलजंती, सलगर बु, कर्जाळ कात्राळ, तांडोर या गावात बहुमत मोठे मिळाल्याने स्थानिक नेत्यांनी ठरवेल त्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे या गावात राजकीय घोडेबाजार होणार नाही तरी सावध पावित्रा घेतला जात आहे. तिर्थक्षेत्र विकास निधी 14 व 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर आल्यामुळे ग्रामपंचायती मालामाल झाल्या. त्यामुळे विकासकामाबरोबर आर्थिक लाभाबरोबर गटबांधणी होत असल्यामुळे ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रीत केले. आगामी पोटनिवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय नेत्यांनी गावपातळीवरील नेत्यांना ताकद दिली. त्यामुळे सरपंच निवड होईपर्यत राजकीय हालचाली निर्णायक वळणावर असून नंदेश्‍वरात निवडणुकीचा गुलाल बाजूला होईपर्यत सर्व सदस्य अज्ञानस्थळी गेले होते. 

परंतु सरपंचपदासाठी त्यातील एकाने दुसऱ्या गटाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पराभूत झालेल्या गटातील तीन सदस्याला बहुमत मिळालेल्या गटाने जवळ करत ते सदस्यही अज्ञातस्थळी नेले. त्यामुळे सरपंच कोण होणार? आणि उपसरपंचपद पराभूत गटाला मिळणार असल्याची चर्चा गावात असली तरी निवडीनंतर या पदावर कोण विराजमान होणार? याची उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या सरपंच निवडीच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांनी भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय गणिते जुळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसू लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Macron France Riots : ‘पॅरिस लवकरच मुस्लिम शहर बनेल’; फ्रान्समधील दंगलीनंतर ट्रम्प यांची मॅक्रॉंन यांच्यावर बोचरी टीका

Pune News: पुणेकरांनो, लक्ष द्या! पुणे-सातारा रस्त्यावरील वाहतुकीत बदल; भुयारी मेट्रोच्या कामामुळे सोमवारपासून बदल लागू

Pandharpur Corridor: पंढरपूर कॉरिडॉरचा मार्ग मोकळा! भूसंपादन उद्यापासून सुरू; बाधितांसाठी १,७५० कोटींचे पॅकेज

Latest Marathi News Live Update : मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचा मेळावा

Gwalior Truck Accident: ग्वाल्हेर ट्रक अपघातातील जखमी भाविकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट; मोफत उपचारांचे निर्देश

SCROLL FOR NEXT