Sarpanch
Sarpanch 
सोलापूर

करमाळा सरपंच आरक्षण : देवळाली, साडे सर्वसाधारणसाठी तर अनुसूचित जातीसाठी वीट व जातेगाव 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यातील वीट, जातेगाव ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी तर जेऊर, कोर्टी, कंदर, केम नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर देवळाली, झरे, वाशिंबे, पांडे, वांगीचे सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी जाहीर करण्यात आले आहे. करमाळा तालुक्‍यातील 105 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात काढण्यात आली. सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यापूर्वी तहसीलदार समीर माने यांनी तालुक्‍यातील 105 ग्रामपंचायतींचे आरक्षण कसे काढले जाईल, याची माहिती दिली. 

या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्ता सरडे, नायब तहसीलदार सुभाष बदे, निवासी नायब तहसीलदार विजय जाधव यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती व तालुक्‍यातील माजी सरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते 

असे राहतील तालुक्‍यातील सरपंच 

  • अनुसूचित जमाती स्त्री : वरकटणे 
  • अनुसुचित जाती स्त्री : कुभारगाव- घरतवाडी, सातोली, खातगाव, तरटगाव, पांगरे 
  • अनुसूचित जाती : सालसे, जातेगाव, बाळेवाडी, सांगवी, वीट, केत्तूर 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री राखीव) : खडकी, हिवरे, कोर्टी, पारेवाडी, केम, सरपडोह, अंजनडोह, टाकळी, जिंती, विहाळ, दिवेगव्हाण, वरकुटे, रोशेवाडी, कुंभेज 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : पोंधवडी, वडगाव, लव्हे, हिसरे, कविटगाव, लिंबेवाडी, सोगाव, पोमलवाडी, फिसरे, सावडी, जेऊर, भोसे, कामुणे, कंदर 
  • सर्वसाधारण स्त्री राखीव : वंजारवाडी, पुनवर केडगाव, मांगी, बोरगाव, दिलमेश्वर, घारगाव, पोटेगाव, हिवरवाडी, मीरगव्हाण, अर्जुननगर, गौंडरे, सौंदे, राजुरी, मांजरगाव, रिटेवाडी, कात्रज, कावळवाडी, देलवडी, कुगाव, बिटरगाव (वा), दहिगाव, आवाटी, मलवडी, गोयेगाव, चिखलठाण, भगतवाडी, शेलगाव (वा), रायगाव, भाळवणी, पांडे 
  • सर्वसाधारण : आळसुंदे, आळजापूर, पाथर्डी, शेटफळ, गुळसडी, बिटरगाव (श्री), मोरवड, पोथरे, उम्रड, साडे, कोंढेज, वांगी, ढोकरी, कोळगाव, उंदरगाव, झरे, करंजे, पाडळी, वडशिवणे, शेलगाव (क), देवीचामाळ, निमगाव, घोटी, पिंपळवाडी, नेरले, वाशिंबे, पोफळज, निंभोरे, देवळाली, को. चिंचोली 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT