Satara news esakal
सोलापूर

Satara : सातारा प्रतिसरकारचे फिल्ड मार्शल, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांची आज १०१वी जयंती

यानिमित्त क्रांतिअग्रणींचा धगधगत्या जीवनकार्याविषयी घेतलेला आढावा

सकाळ डिजिटल टीम

Satara : बापूंचा जन्म तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानातील कुंडल येथे ४ डिसेंबर १९२२ रोजी शेतकरी कुटुंबात झाला. जी. डी. बापू पुणे येथे आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकत असताना स्वातंत्र्य आंदोलनाने भारावून जाऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रतिसरकारच्या लढ्याचे संघटक म्हणून अल्पावधीतच मोठी जबाबदारी पडली.

प्रतिसरकारच्या लढ्यात तुफान सेनेचे फिल्ड मार्शल, आघात दलाचे सरसेनापती म्हणून बापूंनी दाखविलेली कामगिरी व धाडस ही त्यांचे शौर्य आणि कर्तृत्वाची ‘क्रांतिअग्रणी’ ही पदवी गौरवशाली आहे. प्रतिसरकारच्या रोमहर्षक सशस्त्र रणसंग्रामात शेणोली स्टेशन जवळील बिचूद खिंडीत पे-स्पेशल रेल्वेगाडी लुटीची धाडसी योजना आखली. कडेकोट बंदोबस्तातील येरवडा तुरुंगातून क्रांतिवीरांगना लीलाताई पाटील यांची क्रांतिवीरांगना दिवंगत विजयाकांकूच्या सहकार्याने बेमालूम यशस्वी सुटका करताना धुळे खजिना लुटीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत पोटरीतून बंदुकीची गोळी गेली असताना पोलिसांना झुकांडी देऊन यशस्वी पलायन केले. निजाम रझाकारांना पळवून लावणारा, धगधगता योद्धा म्हणून जी. डी बापूंचे शौर्य आणि कर्तृत्वाचा हा-हा म्हणता सर्वत्र दरारा निर्माण झाला होता. योद्धा म्हणून ब्रिटीश साम्राज्यशाहीने जी. डी. बापूंचा धसका घेतला होता. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी बक्षीस जाहीर केले होते.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंनी कष्टकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे १९५७ मध्ये बापू तासगाव मतदारसंघातून विधानसभेवर, तर सन १९६२ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते. यानंतर किसान सभेचे अध्यक्ष म्हणून बापूंनी राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांची संघटित ताकद उभारण्यासाठी जिवाचे रान केले. प्रबोधन आणि संघर्षाच्या मार्गाने जनजागृती आणि संघटनेचे काम सुरू असताना बापूंनी रचनात्मक कामांकडेही कधी दुर्लक्ष होऊ दिले नाही. सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशनची स्थापना करून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मोर्चे, जनआंदोलने उभारली.

शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्यासाठी विजेची उपलब्धता, वीज माफक दरात मिळालीच पाहिजे, याशिवाय, गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतीस पाणी मिळाले पाहिजे, याकरिता बापूंनी सहकार तत्त्वावर तीन लिफ्ट इरिगेशन उभारून शेतीला पाणी उपलब्ध करून देऊन हरित क्रांतीस जन्म दिला. या पार्श्वभूमीवरच बापूंनी क्रांती सहकारी साखर कारखान्याची अल्पावधीतच उभारणी करून महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला. ‘क्रांती’च्या साखरेला जागतिक बाजारपेठेत लौकिक प्राप्त करून दिला. शिवाय, उत्तम प्रशासनामुळे देशपातळीवरील अनेक प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त झालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT