सोलापूर

शाळा बंदच; शिक्षण विभागाने केले ऑनलाइनचे नियोजन 

संतोष सिरसट

सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नेमके काय करायचे याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाता संभ्रम कायम आहे. दरम्यान, शाळा जीर बंद असल्या तरी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळतो यावर त्याचे यशापयश अवलंबून आहे. 

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला म्हणावे तसे यश मिळत नाही. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या बाबतीत शासनाने काहीच निर्णय घेतला नाही. सोशल मिडियावर शाळा सुरु करण्यासंदर्भात वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. मात्र, त्याला शिक्षण विभागाकडून दुजोरा मिळत नाही. याबाबत शासन जेव्हा निर्णय घेईल, तेव्हापासून शाळा सुरु केल्या जातील, अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. काही खासगी शिक्षण संस्थांनी पत्रक काढून शिक्षकांना आलटून पालटून 10 टक्के प्रमाणे शाळेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर शिक्षण संस्थांनी घेतलेला हा निर्णय कितपत योग्य आहे, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अद्यापही पुस्तके पोच झालेली नाहीत. ऑनलाइन शिक्षण देताना विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वॉटसप नंबरवर तयार केलेले व्हीडीओ टाकण्याचे नियोजन सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक शिक्षकांकडून मार्गदर्शन होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे यु-ट्युब, फेसबुक व वॉटसपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत एक स्टिडिओ तयार केला आहे. त्याठिकाणी आतापर्यंत 250 शिक्षकांचे ऑडिओ तयार केले आहेत. ते व्हीडीओ विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वॉटसपवर टाकून त्याद्वारे मुलांनी शिक्षण घ्यावे अशी अपेक्षा शिक्षण विभागाची आहे. उद्यापासून जरी हे शिक्षण सुरु होत असले तरी त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे आहे. 

शिक्षकांनी शाळेत जाऊ नये 
शाळा कधीपासून सुरु कराव्यात, याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी शाळा सुरू करण्याबाबतच्या सविस्तर स्पष्ट सुचना /लेखी आदेश जोपर्यत येत नाहीत, तोपर्यंत शाळेत कुणीही जायची आवशकता नाही. पाठ्यपुस्तके आलेली आहेत. ती कशी वाटप करावे यासंबंधी मार्गदर्शक सुचना अद्याप आलेल्या नाहीत. त्यामुळे आलेली पाठ्यपुस्तके शाळेत नेऊन ठेवावेत. पुस्तक वाटपाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सुचना येतील. 
म. ज. मोरे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ. 

त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थांची 
शिक्षकांना शाळेत जाण्यासंदर्भात काही सूचना दिलेल्या नाहीत. काही संस्थांनी शिक्षकांना आलटून-पालटून शाळेत येण्याची सूचना जरी दिल्या अल्या तरी त्याबाबतची सगळी जबाबदारी संबंधित संस्थांची असेल. सोशल डिस्टसिंग ठेऊन शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे लागेल. पण, कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर त्याची जबाबदारी संबंधित संस्थांनी घ्यावी. 
सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी, माध्यमिक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT