School Close
School Close Sakal
सोलापूर

उन्हाळी सुट्टीतही भरणार शाळा? कोरोनात शाळा बंद राहिल्याने गुणवत्ता घसरली

तात्या लांडगे

राज्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांसाठी सातवीपासूनचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले.

सोलापूर - कोरोनामुळे (Corona) 23 महिन्यांत जवळपास 600 दिवस शाळा बंदच (School Close) राहिल्या. राज्यातील दोन कोटी 13 लाख विद्यार्थ्यांपैकी (Students) 80 लाखांहून अधिक मुलांना (Children) ऍन्ड्राइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षण (Online Education) घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता (Quality) घटली असून शिक्षणाची गोडीही कमी झाली आहे. आता शाळा सुरू होऊनही बहुतेक विद्यार्थी शाळेला येत नसल्याची स्थिती आहे. ही स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंबंधीचा निर्णय शालेय शिक्षण विभाग घेऊ शकतो, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही दिवसांसाठी सातवीपासूनचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले. काही दिवसांत दुसरी लाट सुरू झाली आणि पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले, मात्र पहिली ते सातवीचे वर्ग उघडलेच नाहीत. तिसरी लाट सौम्य असल्याने 1 फेब्रुवारीपासून पहिलीपासूनच्या सर्वच शाळा उघडल्या. तरीही, शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पूर्वपदावर आणून त्यांच्यात पुन्हा शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी उपचारात्मक अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्याचा कृती आराखडा तयार केला जाईल. 2 मे ते 13 जून या काळात शाळांना उन्हाळी सुट्टी असणार आहे. त्या सुट्ट्यांमध्येही काही तासांसाठी शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शनिवार, रविवारीही शाळा सुरू ठेवाव्यात, असे आवाहन केले होते. त्यादृष्टीने अंमलबजावणी केली जाणार आहे. तत्पूर्वी, शिक्षक संघटना, शिक्षक आमदारांशी चर्चा केली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.

कोरोना काळात शाळा बहुतेक दिवस बंद राहिल्या असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसानही झाले, ही वस्तूस्थिती आहे. शिक्षक संघटनांना विश्‍वासात घेऊन शिक्षकांच्या मदतीने सुट्टीतही शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

राज्यातील शाळांची स्थिती...

  • एकूण शाळा - 1,10,229

  • प्रवेशित विद्यार्थी - 2,22,84,854

  • शाळांमधील सध्याची उपस्थिती - 39 टक्‍क्‍यांपर्यंत

  • उन्हाळी सुट्टी - 2 मे ते 13 जून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT