school girl died after being hit by sugarcane tractor accident police traffic marathi news sakal
सोलापूर

Solapur Accident News : उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या धडकेने एका शाळकरी मुलीचा मृत्यू

उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक बसून झालेल्या अपघातात एका नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना

राजकुमार शहा

Mohol News: उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची धडक बसून झालेल्या अपघातात एका नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी कुंभारखाणी(मोहोळ) परिसरात घडली. गुंजन जयपाल पवार वय 9 रा कुंभारखाणी असे मृत शाळकरी मुलीचे नाव आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, गुंजन पवार ही शनिवारी सकाळी शाळा असल्याने घरी आई-वडिलांना शाळेला जाते म्हणून घरातून गेली. थोड्या वेळातच गुंजनचे वडील जयपाल पवार यांना त्यांच्या मित्राचा फोन आला व गुंजनला ट्रॅक्टरने धडक दिली आहे ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाजवळ पडल्याने तिच्या कमरेला जोराचा मार लागल्याचे सांगितले.

जयपाल पवार हे तातडीने त्या ठिकाणी गेले व गुंजनला मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून ती उपचारा पूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेची खबर जयपाल पवार वय 32 रा कुंभारखाणी यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : सामान्यांची एकीची वीण उसवू नये- शरद पवार

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT