school student commit suicide solapur crime police
school student commit suicide solapur crime police  sakal
सोलापूर

Solapur News : एका शाळकरी विध्यार्थीनीने गळफास घेऊन जीवन संपविले

राजकुमार शहा

मोहोळ : पोखरापूर ता मोहोळ येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या 15 वर्षीय शाळकरी मुलीने बाथरूम मध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता 3 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

या प्रकरणी मोहोळ पोलीसात "आकस्मात मृत्यू" अशी नोंद करण्यात आली आहे. या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पोखरापूर येथे जयप्रकाश ब्रह्मदेव बाबर हे आपल्या कुटुंबा समवेत राहतात.त्यांची मुलगी कु श्रावणी जयप्रकाश बाबर वय 15 ही मोहोळ येथे एका महाविद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत होती.

ता 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास श्रावणी ची आजी ही गावातील शेजारी असलेल्या महिलां बरोबर बोलत बसली होती. त्यांना लघुशंकेला जायचे होते म्हणून त्यांनी घरा शेजारी असलेल्या बाथरूमचा दरवाजा ढकलला असता तो उघडला नाही. तो आतुन बंद होता म्हणून त्यांनी मोठमोठ्याने दरवाजा वाजवला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी घरातील इतर सदस्यांना बोलावून घेऊन बाथरूम चा दरवाजा जोराने ढकलून बाजूला केला असता आत मध्ये श्रावणी हिने लोखंडी पाईपला साडीच्या साह्याने गळफास घेतल्याचे निदर्शनाला आले.

तिला कुटुंबीयांनी मोहोळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. या घटनेची खबर श्रावणीचे चुलते विनायक महादेव बाबर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली. मात्र गळफास कशासाठी घेतला हे समजु शकले नाही. या घटनेचा अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT