education logo.jpg 
सोलापूर

शाळा सुरू झाल्या पण विद्यार्थ्यांना नेमके शिकवायचे तरी काय? : शिक्षकांच्या समोर यक्षप्रश्‍न 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू झाल्या आहेत. एका दिवसाआड शाळा, दररोजचे शाळेचे अत्यल्प तास व अध्यापनासाठी कसाबसा एक ते दोन महिन्यांचा कालावधी हे पाहता वर्गात नेमका कोणता अभ्यासक्रम शिकवायचा आहे, याबाबत मुख्याध्यापक व शिक्षक संभ्रमात सापडले आहेत. 
शहरातील सर्वच माध्यामिक शाळांमध्ये अध्यापनाचे काम लॉकडाऊननंतर सुरू झाले आहे. मागील आठवड्यात पाचवी ते आठवीचे वर्ग नियमित सुरू झाले आहेत. शाळा उन्हाळी सुटीत सुरू राहतील, तर अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळेल, असा अंदाज होता. पण शासनाने केवळ एप्रिल अखेरीपर्यंत शाळा सुरु राहतील, असे कळवले आहे. तेव्हा केवळ दोनच महिन्याचा कालावधी मिळत आहे. त्यामध्येदेखील एका दिवसाआड शाळा घेतली जाणार आहे. त्यामुळे हा कालावधी केवळ एक महिन्याचा शिल्लक राहतो. 
दहावीच्या संदर्भात मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्वाधिक प्राधान्याने त्यांच्या बोर्डाची परीक्षा लक्षात घेत त्यांना अधिक वेळ देऊन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांच्यासाठी सराव परीक्षांचे आयोजन करून परीक्षा सरावाची संधी उपलब्ध केली जात आहे. शाळेतील माध्यमिक शिक्षकांनी दहावीच्या वर्गावर लक्ष केंद्रीत केले आहे. 
मात्र आठवी व नववी या वर्गासह इतर वर्गातील विद्यार्थ्यांना नेमका कोणता अभ्यासक्रम शिकवायचा, असा प्रश्‍न शिक्षकांसमोर आहे. केवळ एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत कपात केलेला अभ्यासक्रम वगळला तरी उर्वरित अभ्यासक्रम शिकवणे कठीण झाले आहे. त्यातही इंग्रजी, विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन शाळेत करावे, अशी सूचना आहे. उर्वरित विषय ऑनलाइन पध्दतीने मुलांनी शिकावेत, असेही सांगितले जाते. पण मे महिन्यापर्यंत कोणता अभ्यासक्रम पूर्ण करायचा व परीक्षा कशी होणार, याबत काहीच स्पष्टता व एकवाक्‍यता नसल्याने अडचणी झाल्या आहेत. 

 
ऑनलाइन शिक्षणाचा जोर ओसरला 
लॉकडाउनच्या सुरवातीला ऑनलाइन शिक्षणाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी गांर्भियाने पाहिले. नंतर त्यातील जोर ओसरला. त्यामुळे आता शाळा सुरु झाल्यावर इतर विषयांच्या ऑनलाइन शिक्षणाबाबत सूचना असतानादेखील त्याचे गांभिर्य घेतले जात नाही. पालकदेखील शाळा सुरु झाल्या असल्याने ऑनलाइन शिक्षणाबाबत फारसे गंभीर राहिलेले नाहीत. प्रत्यक्षात भाषा व सामाजिक शास्त्रे ऑनलाइन पध्दतीने शिकणे सुरु ठेवायचे आहे. 

मार्गदर्शन मागवले
आम्ही शासनाकडे उपलब्ध असलेल्या कालावधीत नेमके कोणते अभ्यासक्रमाचे घटक पूर्ण केले जावेत व परीक्षांचे स्वरुप या संदर्भात मार्गदर्शन मागवले आहे. उपलब्ध असलेला कालावधी अत्यंत कमी असल्याने नेमके कोणते पाठ पूर्ण करायचे, याबाबत नियोजन होणे गरजेचे आहे. 
-रेवणसिद्ध रोडगीकर, शिक्षण तज्ज्ञ, सोलापूर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT