सोलापूर

ग्रामीण भागातील शाळांनाही हवी सुटी 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः जिल्ह्याच्या शहरी भागामध्ये असलेल्या शाळांना 31 मार्चपर्यंत सुटी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ज्याप्रमाणे शहरी भागातील शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांनाही सुटी देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शहरी भागातील शाळांना सुटी दिली आहे. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये असणाऱ्या शाळांना समावेश आहे. हे शहरी भाग असल्यामुळे याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्येही अनेक मोठी गावे आहेत. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असलेल्या शाळाही आहेत. त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची रोजच गर्दी होणार आहे. कोरोनाला रोखण्याचा उपाय म्हणून गर्दी न करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. मात्र, ग्रामीण भागातील या शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होते, याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये वैराग, नातेपुते, अकलूज, वडाळा, नरखेड, टेंभुर्णी, शेळगाव, पांगरी, नान्नज, अनगर, मोडनिंब या गावांमध्ये असलेल्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. ते नियमित शाळेला येत असल्याने त्याठिकाणीही मोठी गर्दी होते. ती गर्दी टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शाळांनाही मार्चअखेरपर्यंत सुटी देण्याची मागणी शिक्षकांसह पालकांमधून केली जात आहे. याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT