Remdesivir_Barshi. 
सोलापूर

बार्शीत औषध विक्रेत्याचे दुकान सील ! डॉक्‍टरांच्या आदेशाविना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची केली विक्री

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच तुळशीराम रस्त्यावर असलेल्या शहा हॉस्पिटलमधील औषध विक्री करणाऱ्या दुकान चालकाने डॉक्‍टरांच्या आदेशाविना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची विक्री केली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने औषध दुकान सील करून दुकान चालकास नोटीस दिली आहे. 

अन्न व औषध निरीक्षक नामदेव भालेराव व तहसीलदार सुनील शेरखाने यांनी घटनास्थळी भेट देऊन, तपासणी केली व गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान पंचनामा करून औषध दुकान सील केले. 

डॉ. विक्रांत शहा यांचे हॉस्पिटल कोव्हिड केअर सेंटर म्हणून प्रशासनाने नुकतेच जाहीर केले असून, बुधवारी रात्री येथील औषध विक्रेत्याने चार हजार रुपयांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन एका व्यक्तीला साध्या चिठ्ठीवर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला होता. या इंजेक्‍शनचा तुटवडा असून काळ्या बाजारात इंजेक्‍शनची विक्री होत असल्याची अफवा शहरात पसरली. त्यानुसार प्रशासन खडबडून जागे झाले अन्‌ गुरुवारी सकाळपासूनच चौकशी सुरू झाली. 

पोलिसांनी दुकान चालक व तेथील नोकरांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून ठेवले तर सोलापूर येथून येऊन अन्न व औषध प्रशासन निरीक्षक नामदेव भालेराव यांनी दुकानाची झाडाझडती घेतली. दुकान तपासणीमध्ये अजून तीन इंजेक्‍शन्स आढळून आले असून, यापुढे या दुकानासाठी औषध खरेदी व विक्री करण्यासाठी बंधन घालण्यात आले आहे. त्यांना नोटीस देण्यात येत आहे. परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे भालेराव यांनी या वेळी स्पष्ट केले. 

अन्न व औषध प्रशासन विभागाने कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांना नोंद करून सोडून देण्यात आले. 

शहरातील बार्शी केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने 5 एप्रिल रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे, वाढीव पुरवठा व्हावा, अशी मागणी केली होती. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

Medha Kulkarni: ''मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका'', पुण्यात मेधा कुलकर्णींचा अपमान? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, अभिमन्यू पवारांवर आरोप

Latest Marathi News Live Update : वादग्रस्त पवना धरण बंदिस्त पाईप लाईनचा अंतिम निर्णय येत्या 3 जुलै ला सुटणार : महेश लांडगे भाजपा आमदार

Pune: पाणीकपातीने सोसायट्यांचे बजेट कोलमडले; कात्रज-कोंढवा परिसरातील परिस्थिती गंभीर; देखभाल शुल्कात प्रतिमहिना लाखोंची वाढ

IND vs IRE 1st T20I: वैभव सूर्यवंशी पदार्पणात पाच मोठे विक्रम! पहिली धाव घेताच पराक्रम करणार; सचिनसह रोहितचा विक्रम मोडणार

SCROLL FOR NEXT