sudhakarpant_paricharak. 
सोलापूर

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक (वय 85) यांचे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये निधन झाले. कै. सुधाकरपंत यांच्या पार्थिवावर सकाळी दहा वाजता पुणे येथे शासकीय नियमानुसार मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

सुधाकरपंत यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यांसारखे आजार आणि नव्याने उद्‌भवलेला न्यूमोनिया यामुळे त्यांची ही लढाई कठीण होत गेली. त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार सुरू होते. परंतु सोमवारीय रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. 

सुधाकरपंत यांनी सुमारे पंचवीस वर्षे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊन प्रभावीपणे नेतृत्व केले होते. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसेच मोहोळ तालुक्‍यातील भीमा सहकारी साखर कारखान्याचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले. अडचणीतील अनेक सहकारी संस्थांना आपल्या मार्गदर्शनाने पुन्हा प्रगतिपथावर नेण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्‍टर म्हणून त्यांना ओळखले जात होते. राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी अनेक वर्षे प्रभावीपणे सांभाळली. 

पंढरपूर अर्बन बॅंक आणि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे त्यांनी अनेक वर्षे समर्थपणे नेतृत्व केले. आदर्श प्राथमिक विद्यालय, पंढरपूर एज्युकेशन सोसायटी यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांचे ते मार्गदर्शक होते. सुमारे 50 हून अधिक वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीने त्यांनी आगळावेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळे सहकारातील ऋषितुल्य नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. राजकारणातील संत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. 

ते श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यांच्याच सूचनेनुसार बैलपोळा सणासाठी दोनशे रुपयांचा हप्ताही जाहीर करण्यात आला होता. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने व सहकारी संस्था उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्याच्या राजकारणात सहकारातील डॉक्‍टर अशी त्यांची ओळख होती. 

त्यांच्या निधनाची बातमी आज सकाळी येथे समजताच संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुक्‍यावर शोककळा पसरली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT