Civil Hospital 
सोलापूर

"सिव्हिल'मध्ये अन्य आजारांसाठी स्वतंत्र ओपीडी ! मंगळवार, गुरुवार, शनिवारी उपचाराची सोय 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आणि अन्य आजारांच्या रुग्णांनी रुग्णालयाकडे फिरविलेली पाठ, या पार्श्‍वभूमीवर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील अन्य आजारांची ओपीडी सेवा ठप्प होती. आता पुन्हा ही सेवा सुरू केली असून, आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी कोरोनाव्यतिरिक्‍त अन्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 

शहरात उच्च रक्‍तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, दमा, हृदयरोग, हाडांची झीज, कर्करोगाचे रुग्ण अधिक आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी लठ्ठपणा, मूळव्याधावरील शस्त्रक्रियेची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे. दुर्बिणीद्वारे तपासणी, लेझर शस्त्रक्रिया केली जात असून, डॉ. ठाकूर यांनी स्वत:हून काही शस्त्रक्रिया केल्या आहेत. एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, लठ्ठपणावरील शस्त्रक्रियेला त्यांनी सुरवात करीत रुग्णांमध्ये जागृती केली. स्वत:चे आजार लपविण्याची प्रवृत्ती नष्ट होऊन निरोगी राहण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शहरातील धुळीमुळे रुग्णांमध्ये श्‍वसनाचे आजार बळावत असून, निमोनियासारखे आजार त्यांना होतील, असेही मत डॉ. ठाकूर यांनी नोंदविले आहे. शहरातील कोरोनाचे रुग्ण कमी होत असून, मृतांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे त्यांनी अन्य आजारांच्या रुग्णांसाठी सहा डॉक्‍टर व 13 वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. 

कोरोनातून बरे झालेल्यांवर वॉच 
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना दररोज कॉल करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली जात आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची खबरदारी सर्वोपचार रुग्णालयातून घेतली जात आहे. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रुग्णांना मानसिक आधार असल्याचे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. त्यांचे वजन किती आहे, श्‍वसनाचा त्रास होतो का, किडनी, मेंदू, फुफ्फुसाचा काही त्रास आहे का, त्यांच्या कार्यक्षमेवर कोणता परिणाम झाला आहे का, याची नियमित चाचपणी केली जात आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी स्वतंत्र ओपीडी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. 

रुग्णांनी आजार लपवू नये 
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे म्हणून सर्वोपचार रुग्णालयात आठवड्यातील तीन दिवस तर कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांसाठीही आठवड्यातील तीन दिवस ओपीडी सुरू केली आहे. रुग्णांनी आजार न लपविता सर्वोपचार रुग्णालयातील सेवेचा लाभ घ्यायला हवा. 
- डॉ. संजीव ठाकूर, 
अधिष्ठाता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT