corona 
सोलापूर

सर्व्हर डाऊनने अक्कलकोट तालुक्‍यातील निगेटिव्ह महिला झाली कोरोना पॉझिटिव्ह 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोनामुळे अनेक भन्नाट किस्से आता समोर येऊ लागले आहेत. असाच एक किस्सा अक्कलकोट तालुक्‍यातील बासलेगाव येथील महिलेच्या बाबतीत घडला आहे. गावातून कोणाचाही स्वॅब घेतलेला नाही, अगोदर स्वॅब घेतलेली महिला निगेटिव्ह आली तरी देखील मंगळवारी (ता. 2) रात्री सोलापूर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कोरोना रिपोर्ट मध्ये अक्कलकोट तालुक्‍यातील बसलेगाव येथील महिला कोरोना बाधित आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

आमच्या तालुक्‍यात आमच्या गावात कोरोनाबाधित नसतानाच कोरोना बाधित रुग्ण आला कसा? असा प्रश्नच सर्वांनाच पडला होता. मंगळवारी सायंकाळी सोलापूर शहर व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. या वाऱ्यामुळे इंटरनेट स्लो झाले, सर्व्हर डाऊन झाले. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला. त्यामुळे हा सगळा घोळ झाला आणि बसलेगावची निगेटिव्ह असलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. चाचणीसाठी घेतलेल्या स्वॅबला एसआरएफ नंबर दिला जातो. रिपोर्टची माहिती आरटी पीसीआर या ऍपद्वारे माहिती भरली जाते. हे ऍप आयसीएमआरला लिंक केले असल्याने कोरोना चाचणीचे नमुने, अहवाल ही सर्व माहिती आता ऑनलाइन झाली आहे. 

वादळी वाऱ्यामुळे इंटरनेट स्लो झाल्याने भरलेली माहिती सेव्ह होत नव्हती. माहिती सेव्ह होत नसल्याने अन्य एसआरएफ नंबर त्याठिकाणी टाकून पाहण्यात आला. लाइट आल्यानंतर दुसरा नंबर सेव्ह झाला आणि चुकीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर झाली. या एका तांत्रिक चुकीमुळे बसलेगाव येथील महिला कोरोना निगेटिव्ह असताना कागदोपत्री पॉझिटिव्ह झाली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, तांत्रिक चुकीमुळे ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असल्याचे जाहीर केले होते. ही महिला कोरोना निगेटिव्ह असून याबाबतची माहिती घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT