setuband 
सोलापूर

सेतूबंध प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर : योगिनी राऊळ, गजानन फुसे,विठ्ठल गावस व ज्ञानेश्वर जाधवर मानकरी 

सकाळवृत्तसेवा

सोलापूरः सेतूबंध प्रतिष्ठानचे या वर्षीचे सेतूबंध साहित्य पुरस्कार मुखवटा उतरवल्यावर (कवितासंग्रह), योगिनी राऊळ व दिवस बोलू देत नाहीत (कवितासंग्रह) गजानन फुसे, फिंगर बाऊल (कथासंग्रह) विठ्ठल गावस व यसन (कादंबरी) ज्ञानेश्वर जाधवर यांना जाहीर झाला आहे. 

सेतूबंध प्रतिष्ठान पुळूज (ता. पंढरपूर) यांच्या वतीने सेतूबंध साहित्य पुरस्कार साठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला महाराष्ट्रासह इतर राज्यांतून देखील प्रस्ताव दाखल झाले होते. 

सेतूबंध प्रतिष्ठान साहित्य पुरस्कारासाठी प्राप्त सर्व साहित्यकृतींपैकी निवड समितीकडून आलेल्या निर्णयानुसार सेतूबंध साहित्य पुरस्कारांने सन्मानीत करण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे आहे. सेतूबंध प्रतिष्ठानचा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा कोरोनाचे समूळ उच्चाटन झाल्यानंतरच होणार आहे. 
या साहित्य पुरस्कारांची घोषणा करतेवेळी सेतूबंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी भोसले, उपाध्यक्ष श्रीशैल शिरोळकर, सचिव माधुरी भोसले, सदस्य शिवदास कुंभार, श्रीकांत बाबर, धोंडीराम देठे, उमेश बाबर व समन्वयक सूर्याजी भोसले उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : समीर रिझवीचा तांडव! शतक हुकले, दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबईची हार, Point Table मध्ये मोठी उलथापालथ

पार्क केलेली थार अचानक रिव्हर्स आली, महिलेचा चिरडून मृत्यू; VIDEO VIRAL

धक्कादायक! जत्रेतील आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना, ४० जण जखमी, Video Viral

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT