GP Modnimb 
सोलापूर

नवीन पिढीला स्वप्ने दाखवून सात माजी सरपंच रिंगणात ! मोडनिंबसाठी मातब्बर उमेदवारांमध्ये दुरंगी लढत 

विरण कुलकर्णी

मोडनिंब (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील मोठी आणि महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीची लढत दुरंगी होत आहे. मोठा गाजावाजा करत नवीन पिढीच्या हाती सत्ता सोपविण्याची चर्चा असताना, सात माजी सरपंचांसह जिल्हा परिषदेच्या माजी सभापतीही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर काही मातब्बरांना प्रभाग आरक्षणाचा फटका बसल्याने माघार घ्यावी लागली. सहा प्रभागांत होणाऱ्या निवडणुकीत 17 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत. 

येथील ग्रामपंचायतमध्ये सध्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी यांच्या शहर विकास आघाडीची सत्ता आहे. मागील निवडणुकीत ग्रामविकास आघाडी व लोकशाही आघाडी यांचा पराभव करून त्यांनी सत्ता मिळवली. ग्रामविकास आघाडीचे बाबूराव सुर्वे व त्यांच्या पत्नी माजी महिला व बालकल्याण सभापती नंदा सुर्वे हे दोघे एकाच प्रभागातून शहर विकास आघाडीकडून लढत आहेत. अनेक वर्षे सत्तेत असलेली लोकशाही आघाडी "नाना' मार्गाने एकत्रित आल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे हेही एका प्रभागापुरते वेगळी चूल मांडून निवडणुकीत उतरले आहेत. कोरोना काळात मंदावलेल्या जनमानसाला निवडणुकीच्या वाऱ्याने उत्साह निर्माण केला आहे. 

मोडनिंब परिसरातील अरण, बावी, बैरागवाडी, जाधववाडी, सोलंकरवाडी येथेही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अरण ग्रामपंचायतीमध्ये 13 पैकी आठ जागा बिनविरोध निवड झाल्या आहेत. तर बैरागवाडी ग्रामपंचायतीमध्ये नऊपैकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. सोलंकरवाडी, जाधववाडी येथे दुरंगी लढती रंगल्या आहेत. 

राजकारणी अन्‌ रसिकांची वर्दळ 
लॉकडाउननंतर आता मोडनिंबमधील कला केंद्र खुली झाली अन्‌ ढोलकीचा ताल कला केंद्रात घुमू लागला आहे. दुसरीकडे, मोडनिंबमध्येही ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह आणि कला केंद्रातील दैनंदिन उत्सव एकाच वेळी सुरू झाल्याने राजकारणी आणि रसिकांची वर्दळ वाढली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : धीरेंद्र शास्त्रींच्या आव्हानावर श्याम मानव यांची प्रतिक्रिया

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या कारचे आमदार देवेंद्रांनी केले सारथ्य; मुख्यमंत्र्यांशी झालेली जवळीक ठरली चर्चेची!

SCROLL FOR NEXT