डीसीसी बॅंक शिवणे शाखेत सात लाखांची धाडसी चोरी!
डीसीसी बॅंक शिवणे शाखेत सात लाखांची धाडसी चोरी! Sakal
सोलापूर

डीसीसी बॅंक शिवणे शाखेत सात लाखांची धाडसी चोरी!

उमेश महाजन

सांगोला तालुक्‍यातील शिवणे येथील डीसीसी बॅंकेच्या शाखेत खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांची धाडसी चोरी केली आहे.

महूद (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील (Sangola Taluka) शिवणे येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या (Solapur DCC Bank) शाखेत खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांची धाडसी चोरी(Theft) केली आहे. शिवाय तिजोरीतील कर्जाच्या फाइल्स पेटवून तपास यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्नही केला आहे. ही घटना गुरुवारी (ता. 28) च्या मध्यरात्री घडली आहे. मात्र काल शुक्रवारी व आज शनिवारीही या घटनेतील गुन्हेगारांचा काही शोध लागला नाही. याच शाखेत गेल्या सहा वर्षांपूर्वीही चोरीची घटना घडली होती.

शिवणे (ता. सांगोला) येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा मुख्य चौकालगतच आहे. या परिसरातून अहोरात्र वाहनांची ये-जा सुरू असते. शिवाय गावकऱ्यांच्या वर्दळीने हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बॅंकेच्या इमारतीच्या खिडकीचे गज कापून बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेतील सायरन, सीसीटीव्ही, नेटवर्क, बायोमेट्रिक डिव्हाइस, बॅटरी, यूपीएस आदी सर्व इलेक्‍ट्रॉनिक्‍स साहित्याच्या वायरी तोडून गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी तिजोरी फोडली आहे. तिजोरीत ठेवलेले सात लाख आठ हजार 498 रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. शिवाय तिजोरीत ठेवलेल्या कर्जाच्या फाइल्सही पेटवून त्याचे नुकसान केले आहे. या अज्ञात चोरट्याच्या विरोधात बॅंक कर्मचारी राजेंद्र तुकाराम गुळमिरे यांनी सांगोला पोलिसात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी सकाळी धाव घेतली. चोरट्याच्या तपासासाठी सोलापूर येथून श्वानपथक मागवले होते. शुक्रवारी दिवसभर पोलिस घटनास्थळी ठाण मांडून होते. मात्र दिवसभरात तपासाला फारसे यश आले नसल्याचे समजते. आज शनिवारी (ता. 30) सकाळपर्यंत या घटनेतील गुन्हेगारांचा तपास लागला नसल्याचे समजते.

चोरट्यांचा चकवा व आव्हान

सात लाख रुपयांची रोकड घेऊन गेलेल्या चोरट्यांनी तिजोरीतील कर्जाच्या फाइल्स पेटवून तपास यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर जिल्हा बॅंकेची शाखा शिवणे गावात अगदी अगदी मुख्य चौकात आहे. या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. शिवाय याच शाखेत गेल्या सहा वर्षांपूर्वी धाडसी चोरी झाली होती. त्याच ठिकाणी पुन्हा मोठी चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT