Seven members of the same family in Akkalkot are corona positive 
सोलापूर

अक्कलकोटमधील एकाच कुटुंबातील सात जण कोरोनाबाधित 

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात शुक्रवारी नऊ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहे. यामध्ये शहरातील मधला मारूती परिसरातील एकाच कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. 
आज आढळलेल्या रूग्णांमध्ये शहरातील मारुती परिसर सात, बुधवार पेठ एक, विवेकानंद पार्क एक जणाचा समावेश आहे. यामुळे अक्कलकोट तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या 140 पर्यंत वाढली आहे. यामध्ये अक्कलकोट शहरात 80 तर ग्रामीण भागात 60 रुग्णांचा समावेश आहे. सोमवारी घेतलेल्या 52 स्वॅबपैकी आठ कोरोनाबधित, 12 स्वॅब रद्द तर व 32 निगेटिव्ह आले होते. तसेच मंगळवारच्या 48 स्वॅबमधील दोन कोरोनाबधित व 44 निगेटिव्ह अहवाल बुधवारी रात्री आले होते. आता यातील दोन व बुधवारी घेतलेले 63 असे 65 स्वॅबचे अहवाल प्रलंबित होते. त्यातून शुक्रवारी सकाळी नऊ कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. यात मधला मारुती भागातील एकाच घरातील सात रुग्णांचा समावेश आहे. आता अक्कलकोट तालुक्‍यातील एकूण कोरोनाबधित रुग्ण संख्या 140 आहे. उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण 66 एवढे आहेत. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

SCROLL FOR NEXT