covid 19 vaccination esakal
सोलापूर

धोका ओमिक्रॉनचा : सात लाख लोकांनी अद्याप घेतला नाही पहिला डोस

धोका ओमिक्रॉनचा : सात लाख लोकांनी अद्याप घेतला नाही पहिला डोस

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

लसीबद्दल असलेल्या गैरसमजामुळे जिल्ह्यातील 7 लाख 29 हजार जणांनी अद्यापही पहिला डोस घेतलाच नाही.

सोलापूर : कोरोना (Covid-19) आता संपला... ओमिक्रॉन (Omicron) आपल्याकडे एवढ्यात काय येणार नाही... यासह अनेक भ्रमात जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 29 हजार 445 जण आहेत. कोरोना लसीचा डोस (Covid Vaccine) उपलब्ध आहे परंतु लसीबद्दल असलेल्या गैरसमजामुळे जिल्ह्यातील 7 लाख 29 हजार जणांनी अद्यापही पहिला डोस घेतलाच नाही. सात लाख व्यक्तींमध्ये 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 36 हजार 768 जण आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक तरुण कोरोनाच्या विळख्यात मृत्युमुखी पडल्याचा अनुभव असतानाही कोरोना लसीकरणासाठी (Vaccination) या गटातीलच व्यक्तींचे दुर्लक्ष होत आहे, ही चिंताजनक बाब आहे. (Seven million people have not yet received the first dose of the Covid vaccine)

जगातील 85 देशांमध्ये ओम्रिकॉनचा फैलाव झाला आहे. सोलापूर (Solapur) शेजारी असलेल्या लातूर (Latur) व उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमिक्रॉन व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी कोरोना लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासन वारंवार सांगत असतानाही सोलापुरातील तरुण मात्र कोरोना लसीकरणाकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. यूकेमध्ये मागील दोन दिवसांमध्ये जवळपास तीस टक्‍क्‍याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. ज्या देशात कोरोना लसीकरण झाले आहे त्या देशात बाधितांची संख्या कमी झाल्याचे पाहणीतून आढळले आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाची लस कमी प्रमाणात येत होती, त्यावेळी लस द्या म्हणून आंदोलन करणारे, निवेदन देणारे आता लस उपलब्ध असताना लस घ्या म्हणून पुढे येताना दिसत नाहीत. कोरोना लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी मूलभूत सुविधांकरिता दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

पहिला डोस न घेतलेल्यांची वयोगटानुसार संख्या

  • 18 ते 44 : 6 लाख 36 हजार 768

  • 45 ते 59 : 1 लाख 53 हजार 253

  • 60 वर्षावरील : 61 हजार 2

  • एकूण : 7 लाख 29 हजार 445

पहिला डोस न घेणारे कोणत्या तालुक्‍यातील किती

  • उत्तर सोलापूर : 15 हजार 766

  • दक्षिण सोलापूर : 26 हजार 129

  • मोहोळ : 53 हजार 786

  • मंगळवेढा : 45 हजार 604

  • सांगोला : 71 हजार 233

  • माढा : 52 हजार 922

  • अक्कलकोट : 2 हजार 10

  • करमाळा : 47 हजार 483

  • माळशिरस : 1 लाख 7 हजार 858

  • बार्शी : 60 हजार 340

  • पंढरपूर : 91 हजार 16

  • सोलापूर ग्रामीण एकूण : 5 लाख 74 हजार 147

  • सोलापूर शहर : 1 लाख 55 हजार 298

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील प्रादुर्भाव सोलापूर जिल्ह्याने अनुभवला आहे. तिसऱ्या लाटेला / ओमिक्रॉनला रोखण्यासाठी कोरोना लसीकरणाशिवाय पर्याय नाही. जिल्ह्यात मुबलक लस उपलब्ध आहेत. लस घेण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढाकार न घेतल्यास पुढील काळात अधिक कठोर नियम करावे लागतील. 18 ते 44 वयोगटातील लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या वयोगटातील व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती मानला जाते. स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तरी किमान या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा.

- मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar), जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT