Pawar_Bhalke 
सोलापूर

"विठ्ठल'ची आर्थिक स्थिती चिंताजनक; सगळ्या जुन्या सवंगड्यांना सोबत घेऊन परिस्थिती सुधारावी लागेल : शरद पवार 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : शेतकऱ्यांच्या कष्टातून उभारलेली पंढरपूर तालुक्‍यातील साखर कारखानदारी आज संकटात आहे. त्यामध्ये "विठ्ठल'ची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. ती सुधारण्यासाठी सर्व जुन्या संवगड्यांना सोबत घेऊन यापुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी येथील शेतकऱ्यांनी साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज केले. 

शरद पवार यांनी (कै.) आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची आज सरकोली येथे भेट घेतली. त्यानंतर झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी विठ्ठल कारखान्याच्या आर्थिक स्थितीबद्दल सूचक वक्तव्य केल्याने स्थानिक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्‍यातील पाणी प्रश्न आणि साखर कारखान्याच्या प्रश्नासंबंधित केलेल्या कामाच्या अनेक आठवणी श्री. पवार यांनी या वेळी सांगितल्या. 

या वेळी श्री. पवार म्हणाले, आमदार भालके यांनी गेल्या अनेक वर्षांच्या काळात शेतकरी सभासद आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. पंढरपूरच्या विकासाचा त्यांनी ध्यास घेतला. याच ध्यासाने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. 

थोड्या दिवसांनी मी परत येणार आहे. पंढरपूरच्या साखर कारखान्याचे अर्थकारण बिघडले आहे. त्याच्यावर सगळ्यांना सोबत घेऊन विचारविनिमय करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढे प्रयत्न करावे लागतील. माझे भालके कुटुंबावर यापुढे कायम लक्ष आहे. कोणीही काळजी करू नये. आपला प्रपंच आणि संसार नीट चालावा अशी अपेक्षा असते. अर्थकारण बिघडून केलेल्या राजकारणात माझ्यासारख्याला फार रस नसल्याचे पवार यांनी सांगितले. 

या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली. दरम्यान, शरद पवार यांनी याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवल्याने पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 

या वेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT