SHARP_SHOOTER 
सोलापूर

ब्रेकिंग ! अखेर नरभक्षक बिबट्या ठार !! शार्पशूटरने घातले कंठस्नान; करमाळावासीयांचा जल्लोष 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : अखेर करमाळा तालुक्‍यात तीनजणांना ठार केलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात वन विभाग व शार्प शूटरना यश आले. शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी बिबट्या ठार झाल्याने करमाळावासीयांनी जल्लोष केला. बिबट्यावर वांगी नंबर चार, राखुंडे वस्ती (ता. करमाळा) चार येथे शार्प शूटरने गोळ्या घालून बिबट्याला ठार केले. 

3 डिसेंबर रोजी फुंदेवाडी (रायगांव) येथे बिबट्याने ज्वारीला पाणी देण्यासाठी गेलेले कल्याण फुंदे यांना ठार केले, तर 5 डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री शिंदे या लिंबोणीच्या बागेत लिंबे गोळा करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर हल्ला करत बिबट्याने त्यांनाही ठार केले. तर 7 डिसेंबर रोजी चिखलठार (ता. करमाळा) येथे ऊसतोडणी मजुरागी आठ वर्षीय मुलगी फुलाबाई हरिचंद हिच्यावर हल्ला केला. तिला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात पोचवण्यापूर्वीच तिचे निधन झाले. 

या क्रमश: घटनांमुळे करमाळावासीय भयभीत झाले होते. त्यानंतर बिबट्याने अधूनमधून दर्शन देत नागरिकांच्या मनातील भीती कायम ठेवली होती. त्यानंतर भिवरवाडी (ता. करमाळा) येथे बिबट्याने सोमवारी (ता. 14) पहाटे तीनच्या सुमारास अनिल गोरख आरकिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला तर गायीच्या मानेवर व गळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने गाय बेशुद्ध पडली. 

त्यानंतर बिबट्याचे दर्शन झाले नाही. वनविभागासह शार्प शूटर, ड्रोन कॅमेरे, डॉग स्क्वाड आदी लवाजमा बिबट्याला पकडण्यासाठी किंवा जंग-जंग पछाडलेला असताना शेवटी आज (शुक्रवारी) बिबट्याला ठार मारण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT