Shasan Aplya Dari sakal
सोलापूर

Shasan Aplya Dari : पंढरपुरात शासन आपल्या दारी ; नियोजन सुरू, २७ किंवा २८ फेब्रुवारीला उपक्रम

पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २७ किंवा २८ फेब्रुवारीला शासन आपल्या दारी उपक्रम होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २७ किंवा २८ फेब्रुवारीला शासन आपल्या दारी उपक्रम होणार आहे. हा कार्यक्रम वाखरी येथे घ्यावा की ६५ एकर जागेत घ्यावा, या संदर्भातील अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व पंढरपूरच्या तहसीलदारांना केली आहे.

या कार्यक्रमासाठी ४५ ते ५० हजार लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्या दृष्टीने वाखरी किंवा ६५ एकर जागेत वाहनांची पार्किंग व्यवस्था या अनुषंगाने माहिती प्रशासनाला त्वरित सादर करण्याचीही सूचना केली आहे.

या उपक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापुरात MH 09 वगळता इतर वाहनांसाठी 'प्रवेश कर', महापालिकेचा निर्णय तुघलकी; विरोधकांचा संताप

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

SCROLL FOR NEXT