0Shivbhojan_6.jpg 
सोलापूर

पाच रुपयांत शिवभोजनची मिळणार पार्सल थाळी ! शहरात व ग्रामीण भागात कुठे मिळते थाळी...नक्‍की वाचा

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट थोपवून लावण्याच्या हेतूने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्याच्या हेतूने शिवभोजन थाळी पार्सल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दहा रुपयांऐवजी पाच रूपयांत ही थाळी मिळणार असून त्यासाठी ओळखपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे.

सर्वसामान्यांसाठी शिवभोजन थाळीचा आधार 
दहा रूपयांची शिवभोजन थाळी आता पाच रुपयांत मिळणार आहे. कोरोना वाढत असल्याने निर्बंध लागू केले आहेत, परंतु या काळात सर्वसामान्यांची उपासमार होऊ नये म्हणून पार्सल सेवा सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. 
- अप्पासाहेब समिंदर, अन्नधान्य पुरवठा अधिकारी, सोलापूर 

जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्‍यातील केंद्र बंद करण्यात आले असून सांगोल्यातील दोनपैकी एकाच केंद्रावर शिवभोजन थाळी सुरू आहे. माढ्यात तीन ठिकाणी, पंढरपूर तालुक्‍यात 12, माळशिरसमध्ये एक, करमाळा, मंगळवेढा, अक्‍कलकोट तालुक्‍यात प्रत्येकी दोन, दक्षिण सोलापुरात एका ठिकाणी थाळी मिळते. कोरोनाच्या काळात ज्यांना पोटभर खायला अन्न मिळत नाही, अशांसाठी तालुक्‍यातील केंद्रांवरून पाच रुपयांत थाळी मिळते. त्यात दोन चपाती, एक वाटी भात, भाजी दिली जाते. दररोज वेगळी भाजी देणे अपेक्षित असून त्या व्यक्‍तींची नोंद रजिस्टरमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. कोरोना काळात अनेकांची पोटभर अन्नासाठी भटकंती सुरु असतानाही जिल्ह्यातील केंद्रे सुरु ठेवण्याबाबत प्रशासनच गंभीर नसल्याने काही ठिकाणची केंद्रे पडली आहेत.

शहरातील गरजूंची "या' ठिकाणी सोय 
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील एक केंद्र बंद पडले आहे. तर प्रितम हॉटेल (राजीव गांधी इन्डोअर स्टेडिअमजवळ, अश्‍विनी रुग्णालय परिसर), साईतिर्थ हॉटेल (बसस्थानक परिसर), सूर्यकिरण हॉटेल (मार्कंडेय हॉस्पिटलजवळ), रिध्दी-सिध्दी स्नॅक्‍स सेंटर (मार्केट यार्ड परिसर) आणि एसटी कामत फूड्‌स (एसटी स्टॅण्ड परिसर) याठिकाणी शिवभोजन थाळीची व्यवस्था आहे. गरजूंना त्याठिकाणी कोणत्याही कागदपत्रांशिवाय पाच रुपयांत थाळी उपलब्ध होणार आहे. परंतु, 30 एप्रिलपर्यंत त्याठिकाणी पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT