4BJP_SHivsena_Congress_NCP_3 (2).jpg
4BJP_SHivsena_Congress_NCP_3 (2).jpg 
सोलापूर

महत्त्वाच्या विषय समित्यांवर शिवसेना, कॉंग्रेसचा दावा ! 'एमआयएम' अन्‌ 'वंचित'च्या भूमिकेकडे लक्ष; भाजपची तातडीची बैठक

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेतील सात विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध करण्यासाठी भाजप, कॉंग्रेस, शिवसेनेसह अन्य पक्ष तयार होते. मात्र, शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर बळावलेला आत्मविश्‍वास पाठिशी बाळगून महाविकास आघाडीने आता एमआयएम व वंचित बहूजन आघाडीला सोबत घेऊन विषय समित्यांच्या निवडी करण्याचे निश्‍चित केले आहे. सत्ताधारी भाजपला एकही समिती मिळू न देण्यासाठी महाविकास आघाडीची घडी विस्कटू नये, याची जबाबदारी आमदार संजय शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानंतर भाजपने आज तातडीची बैठक बोलावली असून महाविकास आघाडीने ही समिती वाटपाबद्दल बैठक आयोजित केली आहे.

ठळक बाबी... 

  • आमदार संजय शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर कॉंग्रेस, एमआयएमची भूमिका नरम; आज अंतिम फैसला
  • महापालिकेतील सात विषय समित्यांसाठी भाजपकडे चार तर विरोधी पक्षांकडे पाच मते
  • उद्या (सोमवारी) अर्ज भरण्याची शेवटीची मुदत तर मंगळवारी (ता. 22) सभापती निवडीसाठी मतदान
  • भाजपची स्वबळाची तयारी; महिला व बालकल्याण समितीवरुन आडले 'महाविकास'चे नियोजन
  • शिवसेनेसह अन्य विरोधी पक्ष एकत्रित आल्यानंतर भाजपने बोलावली तातडीची बैठक
  • महाविकास आघाडीची सुरु झाली पुन्हा बैठक; एमआयएम महिला व बालकल्याण समितीवर ठाम
  • शिवसेनेने मागितली महिला व बालकल्याण समिती तर कॉंग्रेसला हवीय स्थापत्य अन्‌ शहर व सुधारणा किंवा आरोग्य समिती

महापालिकेत भाजपकडे 49 नगरसेवक असून विषय समित्या निवडीसाठी त्यांच्याकडे चार मते आहेत. तर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांकडे (महाविकास आघाडी) 39 नगरसेवक असतानाही त्यांना वंचित बहूजन आघाडी व एमआयएमची मदत घेतल्याशिवाय विषय समित्या निवडणुकीत यश मिळतच नाही, हे स्पष्ट आहे. 'तुझे माझे जमेना अन्‌ तुझ्याशिवाय करमेना' या म्हणीप्रमाणे महापालिकेत एकमेकांच्या विरोधात भूमिका घेणारे पक्ष आता भाजपविरोधात विषय समित्या निवडीसाठी एकत्र येत आहेत. मात्र, शिवसेनेने दोनऐवजी एकच समिती द्या, पण महिला व बालकल्याण समितीच द्यावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे. तर अन्य समित्यांच्या बैठकाच होत नाहीत, बजेट नाही म्हणून नावालाच असणाऱ्या समित्या नकोच, अशी भूमिका एमआयएमने घेतली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने स्थापत्य आणि शहर सुधारणा अथवा आरोग्य समिती मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे महत्त्वाच्या समित्या शिवसेना आणि कॉंग्रेसने घेतल्यानंतर अन्य पक्ष आता उर्वरित समित्या घेणार का, याची उत्सुकता लागली आहे. त्यावर आजच्या बैठकीत तोडगा निघेल का, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT