bhagat singh koshyari
bhagat singh koshyari esakal
सोलापूर

शिवसेनेतर्फे राज्यपाल कोश्‍यारी यांचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यपाल कोशारी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

पोलिसांनी आसूड मारू न दिल्याने व आणलेले बॅनर जप्त करत असताना पुरुषोत्तम बरडे व पोलिस निरीक्षक उदय पाटील यांच्यात वाद निर्माण झाला. यावेळी वातावरण चिघळले होते. पोलिसांनी बॅनर जप्त करून नेले. तेव्हा पोलिसांच्या निषेधार्थ शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलनास बसले. जोपर्यंत बॅनर आणत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली. या आंदोलनात शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक भारत बडूरवाले, लहू गायकवाड, भीमाशंकर म्हेत्रे, विष्णू कारमपुरी, महेश धाराशिवकर, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, नगरसेवक विनोद गायकवाड, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे यांच्यासह शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT