सोलापूर

धक्कादायक..! 91 कोटींचा हिशेब गुलदस्त्यात 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः मिळकत कराची किरकोळ थकबाकी असलेल्यांचे नळजोड तोडणे, मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करणाऱ्या महापालिका प्रशासनाने महापालिकेतीलच कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या लाखो रुपयांच्या उचल रकमेचा हिशेब घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. आजअखेर 91 कोटी 21 लाख 02 हजार 406 रुपयांचा हिशेब बाकी आहे. 

शासकीय काम व वैयक्तिक स्तरावर उचल घेतलेल्या रकमांचा हिशेब वेळेत मिळण्यासाठी नियोजन करावे, असे पत्र राज्य शासनाने महापालिकेस पाठवले आहे. त्यानुसार, वेळेत समायोजन न केल्यास संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. समायोजनाबाबत शासनाचे पत्र येऊनही महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याबाबत गांभीर्याने पाहिलेच नाही. त्यामुळे उचल घेणाऱ्यांनाही त्याचे भय राहिले नाही. 

शासनाच्या आदेशानंतर मुदतीत हिशेब दिला नाही तर संबंधितांच्या पगारातून आणि निवृत्त झाले असतील तर पेन्शनमधून वसुली होईल, असा आदेश दिला. त्यानुसार कार्यवाहीही सुरू झाली. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता खातेप्रमुखांच्या वेतनावरच गंडांतर येण्याची शक्‍यता होती. मात्र त्यानुसार काहीच कार्यवाही झाली नाही. आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कोणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना रक्कम हवी आहे, त्यांनी स्वतः खर्चावी व त्यानंतर त्याची मागणी करावी, असे धोरण निश्‍चित करण्यात आले. कंत्राटी पद्धतीने नियुक्त असलेल्या एका तत्कालीन खातेप्रमुखाने तब्बल एक कोटी आठ लाखांची उचल घेतली आहे. त्याचा हिशेब घेण्याकडे महापालिका प्रशासनाची टाळाटाळ दिसून येत आहे. संबंधित खातेप्रमुख हा एका माजी मंत्र्याच्या संस्थेत कार्यरत असल्याने टाळाटाळ होत असल्याची चर्चा आहे. 

काही प्रमुख खातेनिहाय प्रलंबित हिशेब 
परिवहन व्यवस्थापक (37 कोटी 88 लाख), सार्वजनिक आरोग्य अभियंता (28 कोटी 11 लाख), नगर अभियंता, भूमी व मालमत्ता (9 कोटी 75 लाख), आरोग्याधिकारी (5 कोटी 81 लाख), सहायक संचालक नगररचना (1 कोटी 60 लाख), सहायक आयुक्त (स) (1 कोटी 44 लाख), स्वच्छ भारत मिशन (1 कोटी 1 लाख), विधान सल्लागार (65 कोटी 77 लाख), महिला व बालकल्याण समिती (53 लाख 37 हजार), विभागीय अधिकारी क्रमांक सहा (43 लाख 93 हजार), उद्यान (41 लाख 33 हजार), विभागीय अधिकारी एक (32 लाख), सफाई अधीक्षक (29 लाख 26 हजार), क्रीडाधिकारी (26 लाख 84 हजार), मुख्य लेखापाल (47 लाख 46 हजार), 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT