सोलापूर

धक्कादायक... माहेरच्या लोकांनी केला मुलीच्या सासूचा खून 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : मुलीला त्रास देत असल्याच्या कारणावरून मुलीच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना कासेगाव (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. सुनीता नारायण गुंड (वय 50) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

याप्रकरणी मुलगा शहाजी गुंड यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या बाबतची माहिती अशी की, सुनीता गुंड यांचा मुलगा शहाजी याचा विवाह कासेगाव येथील बळीराम गांडुळे यांची मुलगी भाग्यश्री हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर मुलीस नांदवण्याच्या कारणावरून आणि जाचहाटामुळे भाग्यश्रीचे वडील आणि नातेवाइकांनी 16 जानेवारी रोजी सुनीता गुंड यांना पाइप व हत्याराने मारहाण केली होती. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी (ता.21) सुनिता गुंड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा मुलगा शहाजी याने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर करीत आहेत. 

महिलेच्या सोन्याच्या बांगड्या लंपास 
पंढरपूर ः पोलिस असल्याची बतावणी करून अज्ञात चोराने 50 हजार रूपये किंमतीच्या महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व इतर ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (ता. 19) येथील सांगोला चौकात घडली आहे. वजीरा बागवान (मंगळवेढा) ह्या बसने पंढरपुरात आल्या होत्या. येथील सांगोला चौकात उतरल्यानंतर अनोळखी तीन व्यक्ती त्या ठिकाणी आल्या. पुढे पोलीस आहेत तुमच्या 
अंगावरील सर्व सोने काढून तुमच्या पिशवीत ठेवा, असे विश्वासाने सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून महिला आडबाजूला गेली. त्यावेळी चोरांनी त्या महिलेच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी व पाटली हातास तेल लाऊन काढली. त्याठिकाणी लोकांचा ये-जा वाढल्याने बागवान यांची नजर चुकवून तेथून सोन्याची बांगडी व पाटली घेऊन चोर पसार झाले. याबाबत वजीरा बागवान यांचा मुलगा बिलाल गणी बागवान (वय 44, रा. बेगमपूर, ता. मोहोळ) यांनी आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT