Shocking As many as 21 corona patients were found in Mohol taluka till noon on Wednesday
Shocking As many as 21 corona patients were found in Mohol taluka till noon on Wednesday 
सोलापूर

धक्कादायक : मोहोळ तालुक्‍यात बुधवारी दुपारपर्यंत आढळले तब्बल 21 कोरोनाबाधित 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहरातील विविध भागात बुधवारी दुपारपर्यंत 17 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर कामती, भांबेवाडी व सोहाळे या तीन गावात चार रूग्ण असे एकूण 21 रूग्ण आढळून आले असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. अजिंक्‍य येळे यांनी दिली. 
दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस प्रशासनाने दुपारी एक वाजताच शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, किराणा व कापड दुकाने बंद केली आहेत. मोहोळ शहरात सकाळपासूनच गुरूवारी लॉकडॉऊन सुरू होणार म्हणून किराणा, कापड, स्टेशनरी व इतर दुकानात ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. आजच्या रात्रीपर्यंत मुदत आहे म्हणून ग्रामीण भागातील अनेक नागरिक विविध वस्तू खरेदीसाठी शहरात आले होते. मात्र, पोलिस प्रशासनाने सकाळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुपारी एक वाजल्यापासून सर्व दुकाने, हॉटेल व्यवसायिक, भाजी विक्रेते यांना आपापली दुकाने बंद करण्याबाबत ध्वनीक्षेपकावरून आवाहन केले. त्यामुळे शहरातील लहान व मोठ्या व्यापाऱ्यांची तसेच हॉटेल व्यवसायिकांची पळापळ झाली. दरम्यान, ज्या रुग्णांना लक्षणे व त्रास होत आहे त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात येणार असून ज्यांना लक्षणे नाहीत परंतु संशयित वाटतात त्यांना शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करणार असल्याचे गटविकास अधिकारी डॉ. येळे यांनी सांगितले. 
दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आता नागरिकांनीच सतर्क होणे गरजेचे आहे. जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी डॉ. येळे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT