Solapur Crime : आरोपीला अटक  sakal media
सोलापूर

तरूणाचा धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीचा 4 वर्षांपासून‌ पाठलाग, आज मुलीच्या आईलाच बाथरूममध्ये धरले; पोलिसांत ‘पोक्सो’सह विनयभंगाचाही गुन्हा

अंघोळ करून बाथरूममधून बाहेर येत असताना तरुणाने घरात शिरून विनयभंग केला, अशी फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्याच तरुणाने 4 वर्षांपासून मुलीचा पाठलाग करून, मेसेज करूनही त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून संशयिताविरूद्ध विनयभंगासह ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : अंघोळ करून बाथरूममधून बाहेर येत असताना तरुणाने घरात शिरून विनयभंग केला, अशी फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलिसांत दिली. तर त्याच तरुणाने चार वर्षांपासून मुलीचा पाठलाग करून, तिला मेसेज करूनही त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून संशयिताविरूद्ध विनयभंगासह ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सिनेश जनार्धन रनशूर (वय २८) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

मंगळवारी (ता. २७) सकाळी नऊच्या सुमारास बाळे परिसरातील एक महिला घरातील बाथरूममध्ये अंघोळ करून बाहेर येत होती. त्याचवेळी सिनेश रनशुर हा तरुण पीडितेच्या घरात अचानकपणे शिरला. बाथरुमचा दरवाजा ओढून आत आला. तोंड दाबून ओरडू नका म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले, असेही पीडित महिलेच्या फिर्यादीत नमूद आहे.

दुसरीकडे पीडितेची अल्पवयीन मुलगीही यात फिर्यादी आहे. सिनेश रनशुर हा मुलीलाही चार वर्षांपासून मोबाईलवर मेसेज करतोय. तसेच तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याचेही पीडितेने पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्या तरूणाविरूद्ध पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. उद्या (बुधवारी) त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘या’ अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे, दुय्यम पोलिस निरीक्षक विकास देशमुख, पोलिस उपनिरीक्षक राधा जेऊघाले यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून सिनेश रनशुरविरूद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला काही वेळात जेरबंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT