Shockingly the excise officials stockpiled alcohol at the lodge 
सोलापूर

धक्कादायक ! उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यानेच लॉजवर केला मद्यसाठा 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : येथील एका लॉजमधील खोलीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानेच केलेला मद्यचा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मिलिंद मधुकर जगताप (वय 49, रा. भवानी पेठ, पुणे, सध्या रा. पंढरपूर) व युवराज नेताजी पवार (रा. ढोकबाभूळगाव, ता. मोहोळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात मद्यविक्रीसाठी बंदी असताना उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारीच बेकायदेशीर दारु साठ्यासह सापडल्याने खळबळ उडाली आहे. 
या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तसेच त्यांच्या पथकातील पोलिसांना शहर व परिसरातील लॉज तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या पथकाकडून रात्री एकच्या सुमारास तपासणी सुरू असताना पंढरपूर लगत असलेल्या वाखरी येथे सहारा इन हॉटेल व लॉजमधील एका खोलीत बेकायदेशीररीत्या मद्याचा साठा करण्यात आला असल्याची माहिती त्यांना मिळाली. याविषयी उपविभागीय अधिकारी डॉ. कवडे यांना माहिती कळवण्यात आली. ते तातडीने घटनास्थळी आले. लॉजवरील कर्मचारी राजू याला त्यांनी लॉजमधील 103 क्रमांकाची खोली उघडण्यास सांगितले असता त्या खोलीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मिलिंद जगताप उपस्थित होते. त्या खोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा निदर्शनास आल्यावर पोलिसांनी जगताप याच्याकडे त्या विषयी चौकशी केली असता त्यांच्याकडे असा साठा करण्याची परवानगी नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने पोलिसांनी खोलीतील 13 हजार 438 रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला. जगताप तसेच हा मद्याचा साठा आणि विक्री करण्यासाठी दारूचा गुत्ता उघडण्यास व देखरेख करणारा युवराज नेताजी पवार या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ), 68, 83 प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड यांनी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT