Fire 
सोलापूर

नळाला येणारे पाणी भरण्यासाठी दुकानात झोपला अन्‌ आगीत होरपळून मरण पावला ! 

कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : वैराग (ता. बार्शी) येथे तीन मजली रद्दी व्यवसाय व पुस्तक विक्री दुकानाला लागलेल्या आगीत दुकान मालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 23) पहाटे सव्वा तीनच्या सुमारास वैराग ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडली. योगेश सीताराम गुप्ता (वय 45, रा. वैराग, ता. बार्शी) असे आगीत होरपळून मरण पावलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद वैराग पोलिसांत झाली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वैराग ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी गुप्ता बंधू हे तीन मजली पुस्तके विक्री व रद्दीचा व्यवसाय करतात व भाड्याने पंढरपूर अर्बन बॅंकेसमोर राहतात. शनिवारी (ता. 23) पहाटे तीन वाजता नळाला पाणी येणार असल्याने योगेश गुप्ता हे दुकानात झोपले होते. मात्र पहाटेच्या सुमारास अचानक दुकानात आतून आग लागली. या आगीमुळे पुस्तके, पेपर व इतर साहित्याने पेट घेतल्याने धुराचे लोट उठले. 

याबाबत नागरिकांनी लागलीच अग्निशामक दल व पोलिसांना खबर दिली. अग्निशामक दल, पोलिस व ग्रामस्थांनी लोखंडी शटर तोडण्याचा प्रयत्न केला असता शटर तुटले नाही. शेवटी दुकानाची भिंत पाडून आत प्रवेश केला असता आत झोपलेल्या योगेश गुप्ता यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत दिसून आला. 

ही आग आतूनच शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची खबर मृत योगेश गुप्ता यांचा भाऊ विजयकुमार सीताराम गुप्ता (वय 32, रा. वैराग, ता. बार्शी) यांनी वैराग पोलिसात दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT