सोलापूर

सोलापुरातील दुकाने सुरु ; विडी कारखान्याबाबत आज निर्णय

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : लॉकडाउनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली शहरातील दुकाने आजपासून (शुक्रवार) सुरू होत आहेत. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने सुरू राहणार आहेत. दरम्यान, आयुक्तांनी ठेवलेला प्रस्ताव मंजूर नसल्याने विडी कारखान्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा या संदर्भातील आदेश जारी केले. 


दुकाने उघडण्याबाबत बुधवारी काढलेल्या आदेशामध्ये महापालिका आयुक्तांनी दुरुस्ती केली आहे. नव्या निर्णयानुसार आता दुभाजक नसलेले रस्ते ः शहर भागातील मुख्य रस्ता पूर्व-पश्‍चिम चालीचा असल्यास उत्तर बाजूकडील सर्व दुकाने एका दिवशी आणि दक्षिण बाजूकडील सर्व दुकाने दुसऱ्या दिवशी, उत्तर बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार व दक्षिण बाजूकडील दुकाने मंगळवार, गुरुवार व शनिवार याप्रमाणे व मुख्य रस्ता दक्षिणोत्तर असल्यास पूर्वेकडील दुकाने मंगळवार, गुरुवार, शनिवार तर पश्‍चिम बाजूकडील दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवार उघडे राहतील. अशा पद्धतीच्या क्रमाने (अत्यावश्‍यक सेवा वगळून) निश्‍चित करून दिलेल्या वेळेनुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दुकाने उघडी ठेवण्यात येतील. 
शहरातील विडी कारखानदारांनी विडी पत्ता कामगारांच्या घरी द्यावा आणि विड्या घरातूनच गोळा कराव्यात, असा प्रस्ताव आयुक्तांनी ठेवला होता. त्यानुसार दुपारी शासकीय विश्रामधाममध्ये कारखानदारांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांशी चर्चाही केली. सायंकाळी आयुक्तांनी कारखान्यांना भेटी दिल्या. त्यावेळी सुरक्षित अंतराचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, याची खात्री त्यांना झाली. त्यामुळे विडी कारखानदारांना त्यांनी प्रस्तावानुसार कार्यवाहीची सूचना केली. याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे कारखानदारांनी सांगितले. मात्र ते चर्चेसाठी महापालिकेत आले नाहीत. त्यामुळे या संदर्भातील आदेश निघाला नाही. तो शुक्रवारी निघण्याची शक्‍यता आहे. 


किराणा दुकाने आता सायंकाळी पाचपर्यंत 
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी किंवा इतरत्र ठिकाणी असणारी किराणा दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहतील. रविवारी बंद राहतील. पूर्वी ही वेळ सकाळी 11 वाजेपर्यंत होती. औषधे, दूध, भाजीपाला विक्रीची दुकाने पूर्वीच्या वेळेप्रमाणे सुरू राहतील, अशी दुरुस्तीही केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS T20I: भारत - ऑस्ट्रेलिया वनडे मालिका संपली आता सुरू होणार टी२० मालिकेचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

'12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...' सतीश शाह यांचा निधनापूर्वी केलेला सचिन पिळगांवकरांना मॅसेज, म्हणाले...'सतीश आणि मी... '

Latest Marathi News Live Update : 'हे लोक आधीच जनतेला गोंधळात टाकत आहेत...'-मनोज तिवारी

Accident News : दुर्दैवी अपघात! गिरनारला देवदर्शनासाठी जात असताना बडोद्यात सांगलीच्या दोघांचा जागीच मृत्यू

पक्ष भाजपमध्ये विलीन करा, मोदी-शहांनी शिंदेंना आदेश दिल्याचा राऊतांचा दावा; दिल्ली दौऱ्यावरून टीका

SCROLL FOR NEXT