Pandharpur Rain Update Sakal
सोलापूर

Pandharpur Rain Update : मुसळधार पावसामुळे श्री विठ्ठल मंदिराला गळती

मंदिर संवर्धन कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह; चौळखांबी, रुक्मिणी सभामंडपाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

Pandhapur News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन आणि जतन करण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना सलग आलेल्या तीन दिवसांच्या पहिल्याच पावसामुळे मंदिरातील अनेक भागात गळती सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे मंदिराच्या सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत भाविकांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे.

श्री विठ्ठल मंदिराला सातशे वर्षाचे पुरातन मुळ रूप देण्यासाठी राज्य शासनाने सुमारे ७४ कोटी रुपये मंजूर केले आहे. राज्य शासनाच्या निधीमधून सध्या विठ्ठल मंदिर संवर्धन आणि जतन करण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम सुरू आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्यासह मंदिर इतर भागातील सुमारे निम्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सध्या वेगाने सुरू आहे.

हे काम सुरू असतानाच मंदिरातील नैद्यगेट, चौळखांबी, रुक्मिणी सभामंडपासह इतर अनेक ठिकाणी गळती लागल्याचे दिसून आले आहे. शिवाय मंदिरातील भिंतीवरून पावसाचे पाणी झिरपून आतमध्ये आल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे मंदिरातील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून पंढरपूर शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्री देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे रात्रभर झालेल्या पावसामुळे मंदिरात अनेक ठिकाणी गळती सुरू असल्याचे आज सकाळी दिसून आले.

विठ्ठल मंदिराच्या कामासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशा सूचना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मंदिर समिती व संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. त्यानंतरही पहिल्याच पावसात मंदिरात पाणी झिरपल्याने कामाच्या दर्जाबाबत भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिर समितीने मंदिराच्या कामाच्या दर्जाबाबत लक्ष घालावे, अशी मागणीही आता पुढे आली आहे.

मागील चार दिवसांपासून पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागात भिंतीवरून पाणी झिरपले आहे. लवकरच मंदिराच्या सर्व भागात वाटरप्रूफिंग केले जाणार आहे. त्यानंतर मंदिरात गळती होणार नाही.

- राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील पुर्णेकर कुटुंबियांच्या भेटीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत दाखल

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT