Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory election pressure on the administration Ajit Jagtap solapur
Shri Sant Damaji Sahakari Sugar Factory election pressure on the administration Ajit Jagtap solapur  sakal
सोलापूर

सोलापूर : आमदाराकडून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न - अजित जगताप

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदारांनी प्रशासनावर दबाव टाकून आमच्या पॅनलच्या उमेदवाराचे अर्ज मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनी केला श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी समविचारी गटाच्या निवडणुक प्रचाराच्या शुभारंभ माचणूर येथील येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते, यावेळी राहूल शहा,शिवानंद पाटील, रामकृष्ण नागणे, शिवाजीराव काळुंगे, दामोदर देशमुख,अॅड नंदकुमार पवार,युन्नुश शेख,दादा गरंडे,पी.बी.पाटील,औदुंबर वाडदेकर,तानाजी खरात, अशोक, चौंडे,यादाप्पा माळी,आदीसह समविचारी गटाचे उमेदवार यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, कारखाना खासगी करण्यासाठी 19 हजार 500 सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाने केला.तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर कारखान्यावरील सत्तेसाठी थकबाकीच्या कारणावरून पात्र सभासदाला वगळून 2 हजार 500 अल्पवयीन मुलांना या निवडणुकीत सभासदत्व देण्याचा प्रयत्न केला.नवीन सभासदत्वापोटी जमा केलेले 2.5 कोटी कुठे आहेत असा सवाल करून कारखान्याच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये गंभीर त्रुटी दाखवल्या असून जवळपास 28 कोटी रुपयांची साखर परस्पर विकल्याचे अहवालात नमूद केले.विद्यमान संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे, 11 महिन्याचा पगार,शेतकऱ्याची बिले देण्यास टाळाटाळ केली.

कामगार पतसंस्थेच्या कर्जाचे हप्ते पगारातून घेतले पण पतसंस्थेकडे जमा केले नाही ती पतसंस्थाही बंद पाडण्याचा प्रयत्न केला.कोरोनातील मृत कामगाराचे वारस अजून पैशासाठी टाहो फोडत आहेत.सध्या कारखान्यात साखर शिल्लक नाही तरी देखील शेतकऱ्यांची जवळपास 28 कोटी रुपयांची देणे आहे त्यामुळे कारखाना वाचवायचा असेल तर सत्तांतर करणे आवश्यक आहे विद्यमान संचालक मंडळांने दरवर्षी कारखान्यातील पैसे वापरून त्याचा वापर पोटनिवडणुकीसाठी केला असून त्यामुळे कारखान्यावरील कर्ज कमी होण्याऐवजी वाढत गेले.प्रास्ताविक सुनील डोके यांनी केले,यावेळी राहूल शहा, अशोक चौडे, पी.बी. पाटील,शिवानंद पाटील,अॅड नंदकुमार पवार,दामोदर देशमुख,राजेद्र पाटील आदीची भाषणे झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT