Shivajirao Kalunkhe
Shivajirao Kalunkhe Sakal
सोलापूर

दामाजीने ऊस बिलेही अदा केली ही समाधानाची बाब - शिवाजीराव काळुंखे

हुकुम मुलाणी

दामाजीचे विद्यमान संचालक मंडळ चांगले काम करणारे असून, त्यांना आमची नेहमीच साथ असेल. कमी काळात कामगारांनी सर्व कामे पूर्ण केली.

मंगळवेढा - दामाजीचे विद्यमान संचालक मंडळ चांगले काम करणारे असून, त्यांना आमची नेहमीच साथ असेल. कमी काळात कामगारांनी सर्व कामे पूर्ण केली. तर ऊस बिलेही अदा केली ही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंखे यांनी व्यक्त केले.

श्री संत दामाजी कारखान्याच्या 30 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे शुभहस्ते, माजी अध्यक्ष ॲड. नंदकुमार पवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तत्पूर्वी उपाध्यक्ष तानाजी लक्ष्मण खरात व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना तानाजी खरात यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा करण्यात आली. यावेळी अतिथी रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, बळीराजा पतसंस्थेचे अध्यक्ष दामोदर देशमुख, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, रामचंद्र वाकडे, यादाप्पा माळी, शशिकांत बुगडे, प्रकाश गायकवाड, पी. बी. पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, अजित जगताप, मारुती वाकडे, भारत पाटील, जालिंदर व्हनुटगी, अशोक माळी, भारत नागणे, चंद्रशेखर कोंडूभैरी, मनोज ठेंगील, काशिनाथ पाटील, नितीन पाटील, राजू पाटील, रामचंद्र सलगर, संतोष सोनगे, महावीर ठेंगील, बबलू सुतार,सह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद-शेतकरी, ऊस तोडणी-वाहतूक ठेकेदार, कर्मचारी वर्ग, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवाजी काळुंगे म्हणाले की, 1 ऑक्टोबरला कारखाने चालू करण्याची तयार सर्वच कारखान्यांनी केली होती. परंतु, शासनाने 15 दिवस वाढवल्याने तयारीला आणखी वेळ मिळाला. शेतक-यांच्या दारापर्यंत जाण्याची जबाबदारी संचालक मंडळाची असते  आणि त्यादृष्टीने काम केले पाहिजे.

अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की गेल्या दोन महिण्यापासून हे संचालक मंडळ काम करीत आहे. आम्ही सत्तेत आलो त्यावेळी खात्यावर फक्त 3 लाख शिल्लक होते, संस्था अडचणीत आहे. परंतु तालुक्याच्या विकासाचा केंद्र बिंदू असणारी ही संस्था चांगली चालली पाहिजे. सर्व मार्गदर्शकाने मदत केली, यंदाच्या गळीत हंगामासाठी तोडणी वाहतूक यंत्रणी पूर्ण क्षमतेने उभी केली. मात्र दोन महिण्याच्या काळात कामगारांनी रात्रीचा दिवस करुन ऑफ सिझनमधील कामे पूर्ण केल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. एफआरपीची राहिलेली रक्कमही लवकरच शेतक-यांना अदा करताना येणा-या गळीत हंगामात 5 लाख मे टनाचे उदिष्ठ निश्चीतच पार केले जाईल, अशी ग्वाही दिली.

ॲड. श्री. नंदकुमार पवार म्हणाले कि, या संचालक मंडळातील अनेक जण मागील संचालक मंडळात काम केलेले आहेत. कारखान्याच्या उशा-पायथ्याला मुबलक ऊस आहे. योग्य नियोजन केल्यास ठरविलेले गाळपाचे उद्षि्ठ गाठण्यास अडचण येणार नाही. कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक असल्याने कारखान्यावर सभासद-शेतक-यांचा विश्वास आहे. तर कामगार प्रामाणीकपणे काम करणारा असुन, त्यांना विश्वासात घेवूनच काम करताना संचालक मंडळाने चेअरमनना निर्णय घेण्याची मोकळीक दिली पाहिजे. उपस्थिताचे स्वागत करताना कार्यकारी संचालक  सुनिल दळवी यांनी केले. सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी तर आभार संचालक श्री दिगंबर भाकरे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT