Shivaji College 
सोलापूर

भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयास "स्टार स्टेटस'चा दर्जा 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : येथील श्री शिवाजी महाविद्यालयास भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या वतीने "स्टार स्टेटस' हा सन्मान प्राप्त झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात यांनी दिली. याप्रसंगी स्टार कॉलेज उपक्रमाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. गुरमे उपस्थित होते. 

महाविद्यालयास 2017-18 ते 2019-20 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी महाविद्यालयातील विज्ञान व तंत्रज्ञानविषयक बाबींच्या सशक्तीकरणासाठी 69 लाख रुपयांचे अनुदान जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाले होते. अनुदानाच्या माध्यमातून महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम, विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत झालेली गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी बाबींचे मूल्यांकन जैवतंत्रज्ञान विभागाच्या समितीकडून करण्यात आले. त्यास अनुसरून या समितीने महाविद्यालयाची निवड "स्टार स्टेटस' पुरस्काराच्या सादरीकरणासाठी केली. त्यानुसार महाविद्यालयाचे सादरीकरण ऑनलाइन पद्धतीने जैवतंत्रज्ञान विभागाच्या कार्यबल गटासमोर 25 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. 

सादरीकरणानंतर कार्यबल गटाने केलेल्या शिफारशीनुसार श्री शिवाजी महाविद्यालयाला 9 डिसेंबर रोजी स्टार स्टेटस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयास या उपक्रमांतर्गत पुढील तीन वर्षांसाठी 1.89 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. अनुदानाच्या माध्यमातून महाविद्यालयातील रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भौतिकशास्त्र, विजाणूशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र या विभागांना आधुनिक प्रयोगशाळा साहित्य प्राप्त होणार आहे. 

अनुदानातून महाविद्यालयामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी शिबिरे, कार्यशाळा आणि विविध वैज्ञानिक उपक्रम राबविले जाणार आहेत. 
समाजामध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी या योजनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. महाविद्यालयाच्या या यशप्राप्तीसाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार समितीचे सदस्य यांचे मार्गदर्शन व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व समाजातील विविध घटक यांचे सहकार्य लाभले. 

महाविद्यालयाच्या या यशाबद्दल अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, सेक्रेटरी व्ही. एस. पाटील, जॉइंट सेक्रेटरी पी. टी. पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर आदींनी प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, स्टार कॉलेज उपक्रमाचे समन्वयक डॉ. व्ही. एम. गुरमे, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांचे माजी विद्यार्थी व समाजातील विविध घटकांनी अभिनंदन केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

Latest Marathi News Live Update : पुण्याला अवकाळीचा तडाखा, ३ तासात १४ ठिकाणी पडली झाडे

SCROLL FOR NEXT