Shri Swami Samarth Maharaj
Shri Swami Samarth Maharaj Sakal
सोलापूर

श्री दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भक्तांचा महापूर

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित (Datt Birth Anniversary) येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार म्हणून ओळखले जाणारे सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज (Shri Swami Samarth Maharaj) यांच्या चरणी नतमस्तक होत हजारो भक्तांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेतला. पौर्णिमा व दत्तजयंतीच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये भक्ती व भक्तांचा महापुर आला. सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्मोत्सवाचा पाळण्याचा कार्यक्रम वटवृक्ष मंदिरात संपन्न झाला. दत्तनामाच्या जयघोषाने अक्कलकोट नगरी दुमदुमली.

पौर्णिमा,दत्तजयंती व सलग सुट्ट्यामुळे शहरात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांनी अलोट गर्दी केली. शहरातील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर,श्री स्वामी समर्थ समाधी मठ,एवन चौक उद्यानातील श्री दत्तात्रेय मंदिर,राजेराय मठ व राम गल्ली येथील एकमुखी दत्त मंदिर आदीसह विविध ठिकाणी दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासून भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कोविड-19 व ओमायक्राँनबाबतच्या निकषांचे पालन करीत मास्क असलेल्या भक्तांना मंदिरात टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडण्यात येत होते.

दिवसभर राज्यभरातील पायी दिंड्या,पालख्या सोबत शेकडो भक्त दर्शनासाठी मंदिरात येत होते. भक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे,सचिव आत्माराम घाटगे,विश्वस्त महेश गोगी,संजय पवार,गिरीश पवार,प्रसाद सोनार, मंगेश जाधव,श्रीनिवास इंगळे,प्रा.शरणप्पा अचलेर,नागनाथ गुंजले आदी प्रयत्नशील होते. सायंकाळी सहा वाजता ज्योतिबा मंडपात श्री दत्तजयंतीनिमित्त पाळण्याचा कार्यक्रम व गुलालाची उधळण करीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,मंदिराचे मुख्य पुजारी मोहन गुरुजी,मंदार महाराज,व्यंकटेश महाराज उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्यात वाढलेल्या गर्दीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.अनेक ठिकाणी ट्राफिक जाम होऊन लांबच लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. परंतु आज दत्तजयंतीनिमित्त रेकॉर्डब्रेक गर्दी होऊन सुद्धा कुठेही ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली नाही. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भाविकट्टी,धनराज शिंदे,विपिन सुरवसे,गजनान शिंदे आदींनी चोख नियोजन करून वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही याची काळजी घेतली. उखले गल्ली,राजे फत्तेसिंह चौक,अन्नछत्र मंडळ चौक येथे बॅरिकेट्स लावून व योग्य पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतूक व्यवस्थेवर व गर्दीवर नियंत्रण ठेवले.भक्तांची अलोट गर्दी व वाहनांची प्रचंड गर्दी होऊनसुद्धा आज शहरात कुठेही ट्राफिक जाम झाले नाही किंवा वाहतूक व्यवस्था कोलमडलेली नव्हती. याबाबत पोलिस खात्याच्या कौशल्य व नियोजनाचे कौतुक सर्वत्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT