Shri Vitthal Prasad will be a home delivery a unique concept of entrepreneur in Pandharpur 
सोलापूर

श्री विठ्ठलाचा प्रसाद मिळणार घरपोच; पंढरपुरातील उद्योजकांची अनोखी संकल्पना 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या भीतीमुळे यंदाची आषाढी यात्रा भरणार नसल्यामुळे लाखो विठु भक्तांना यंदा पंढरपूरला येता येणार नाही. तथापि सावळ्या विठुरायाचा प्रसाद भाविकांना घरपोच मिळावा यासाठी पंढरपुरातील काही उद्योजकांनी एकत्रित येऊन ना नफा ना तोटा तत्त्वावर भाविकांना "प्रसाद रूपी पंढरीची वारी' पोचण्यासाठी अनोखी संकल्पना सुरू केली आहे. त्यामुळे यात्रेला भाविक येऊ शकणार नसले तरी विठुरायाचा प्रसाद मात्र घरपोच होण्याची व्यवस्था झाली आहे. 
आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपुरात आल्यानंतर प्रासादिक वस्तूंची खरेदी करत असतात. हे लक्षात घेऊन पंढरपुरातील देशपांडे पेढेवाले, महाप्रसाद अगरबत्ती, जव्हेरी प्रासादिक वस्तू केंद्र तसेच स्वरूप माळी या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन कुरिअरच्या माध्यमातून होम डिलिव्हरी देण्यासाठी "पंढरी प्रसाद' ही ऑनलाइन लिंक सुरू केली आहे. 
या माध्यमातून आता राज्यभरातील लोकांना व्हॉट्‌सऍपद्वारे आपली मागणी नोंदवता येईल आणि पुढील सात दिवसांत पंढरपूरच्या प्रासादिक वस्तूंची घरपोच डिलिव्हरी मिळवता येईल. यात पंढरपूरचे प्रसिद्ध असणारे हळदीचे कुंकू, सुवासिक बुक्का, केशरी अष्टगंध, गोपीचंद, सुवासिक ओली अगरबत्ती, ओरिजनल तुळशीची माळ, काशाचे टाळ, केशरी पेढे, चुरमुरे-बत्तासे प्रसाद तसेच श्री विठ्ठलाचे फोटो फ्रेम आणि काही पुस्तके देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर ही विक्री करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Nagpur Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

Latest Marathi News Live Update : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

Murtizapur-Akola News: पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपावर रांगा; भरीत भर सकाळपासून तीन पेट्रोल पंप बंद; साठा येण्यास विलंबामुळे पंप बंदची माहिती

Rahul Gandhi:गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारात वाढ:राहुल गांधी, भाजप सरकारच्या कार्यकाळात तिरस्कार,भेदभावात वाढ!

SCROLL FOR NEXT