Pandharpur Canva
सोलापूर

पंढरपूर : श्रीविठ्ठल मंदिरात रात्री नऊ पर्यंतच मिळणार दर्शन

रात्रीच्या जमावबंदीमुळे साडेआठला दर्शनरांग होणार बंद

सकाळ वृत्तसेवा

रात्रीच्या जमावबंदीमुळे साडेआठला दर्शनरांग होणार बंद

पंढरपूर : कोरोना विषाणूच्या(corona) पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (collector milind shambharkar )यांनी काढलेल्या आदेशाची दखल घेऊन श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात भाविकांना रात्री दहा ऐवजी रात्री नऊ पर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. दररोज रात्री साडे आठ वाजता दर्शन रांग बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्‍मिणी(vithhal temple pandharpur) मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात भाविकांना ७ ऑक्‍टोबरपासून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत प्रवेश दिला जात होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाताळ सुटीमुळे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येऊ लागलेले असताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ नुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात सर्व सावर्जनिक ठिकाणी रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाची दखल घेऊन आज रविवार (ता.२६) पासून श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात भाविकांना सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेतच मुखदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून दर्शन रांग दररोज रात्री साडे आठ वाजता बंद केली जाणार आहे, असे श्री.गुरव यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT