Pangri Gram 
सोलापूर

पांगरी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड यांनी घेतला पदभार 

बाबासाहेब शिंदे

पांगरी (सोलापूर) : कोरोना संसर्गामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ न शकल्याने मुदत संपलेल्या पांगरी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड यांनी पदभार घेतला. जिल्हा परिषद सदस्या रेखा राऊत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मावळते सरपंच युन्नूस बागवान यांचाही सत्कार करण्यात आला. 

या वेळी ग्रामसेवक संतोष माने, ग्राहक समितीचे तालुकाध्यक्ष विष्णू पवार, माजी सरपंच जयंत म्हसे, दिलीप जानराव, विश्वास देशमुख, गणेश जाधव, विलास लाडे, किशोर बगाडे, संतोष बगाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

बार्शी तालुक्‍यातील लोकसंख्येच्या व ग्रामपंचायत सदस्य संख्येबाबत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे वेळेत निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्याचबरोबर पहिल्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची पाच वर्षांची मुदत संपली होती. या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या कालवधीत गावचा विकास रखडला जाऊ नये, या उद्देशाने प्रशासकामार्फत विकासास चालना मिळणार आहे. 

या वेळी रेखा राऊत म्हणाल्या, की गावाच्या विकासाबाबत राजकारण आणू नये. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. गावातील अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. 

पाच वर्षांचा कालावधी सर्वांना मिळून - मिसळून पार पाडल्याबाबत सरपंच युन्नूस बागवान यांचे कौतुक करण्यात आले. 

प्रशासक श्रीहरी गायकवाड म्हणाले, की माझ्याच गावात माझी प्रशासक म्हणून नेमणूक झाल्याचे भाग्य मिळाले आहे. सर्वांच्या सहकार्याने गावातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मी देतो. 

श्रीहरी गायकवाड यांची पांगरी ग्रामपंचायतीबरोबरच पांढरी, शिराळे, काटेगाव या ठिकाणीही प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. 

ग्रामसेवक संतोष माने यांनीही मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT