जिल्हा दूध संघ निवडणूक : सिद्धाराम म्हेत्रेंचा पत्ता कट, राजन पाटलांचा वाढला वट!
जिल्हा दूध संघ निवडणूक : सिद्धाराम म्हेत्रेंचा पत्ता कट, राजन पाटलांचा वाढला वट! Sakal
सोलापूर

जिल्हा दूध संघ निवडणूक : म्हेत्रेंचा पत्ता कट, पाटलांचा वाढला वट!

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आता 316 मतदार असणार आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघावर (Solapur District Co-operative Milk Producers and Processing Association) संचालक म्हणून येण्यासाठी माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांच्या नावाचा ठराव सांगवी (ता. अक्कलकोट) येथील श्रीगणेश संस्थेतून झाला होता. म्हेत्रे हे सांगवीचे रहिवासी नसल्याने त्यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. दुग्धचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम (Dr. Mahesh Kadam) यांनी हा आक्षेप मान्य करत म्हेत्रे यांचे नाव मतदार यादीतून वगळले आहे. मोहोळमधील (Mohol) दूध संस्थांनी दाखल केलेल्या हरकती 81 हरकतींपैकी 47 हरकती मान्य झाल्याने मोहोळमध्ये 47 मतदार वाढले आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांमध्ये माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या गटाच्या संस्थांची संख्या लक्षणीय असल्याने दूध संघाच्या आगामी निवडणुकीत माजी आमदार राजन पाटील यांचा वट वाढल्याचे दिसत आहे. (Siddaram Mhetre dropped out of District Milk Association elections)

दूध संघाच्या निवडणुकीसाठी पूर्वी 263 मतदार पात्र ठरले होते. म्हेत्रे यांचे नाव कमी झाल्याने ती मतदार संख्या 262 झाली असून त्यामध्ये 54 नवीन मतदार वाढले आहेत. दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आता 316 मतदार असणार आहेत. प्रारूप यादीवर दाखल झालेल्या दावे व आक्षेपांचा निकाल डॉ. कदम यांनी दिला आहे. या निकालातून ही माहिती समोर आली आहे. दूध संघाच्या आगामी निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) व आमदार समाधान आवताडे (Samadhan Awtade) यांची जोडी पॉवरफुल्ल होती. आता माजी आमदार राजन पाटील यांची देखील ताकद या निवडणुकीसाठी वाढल्याचे दिसत आहे.

नेत्यांच्या नावावर अन्‌ गावावर धावणे, आवताडेंचे बोट

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), बबनराव आवताडे (Babanrao Awtade), सुरेश हसापुरे (Suresh Hasapure), औदुंबर वाडदेकर, योगेश सोपल (Yogesh Sopal), रणजितसिंह शिंदे, प्रभाकर कोरे, दीपक माळी या नेत्यांचे गाव आणि दूध संघात येण्यासाठी त्यांनी ठराव केलेल्या संस्थेचे गाव याबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. माजी मंत्री म्हेत्रे यांचा आक्षेप मान्य करून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले आहे. उर्वरित नेत्यांच्या विरोधातील आक्षेप फेटाळले असून त्यांची नावे मतदार यादीत कायम राहिली आहेत. दूध संघ बचावच्या माध्यमातून न्यायालयीन लढा देणारे डिकसळच्या (ता. मोहोळ) जगदंबा दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब धावणे व विरवडे (ता. मोहोळ) येथील चंद्रभागा संस्थेचे चेअरमन अनिल अवताडे यांनी हे आक्षेप घेतले होते. दीपक माळी यांच्या नावावर केम (ता. करमाळा) (Karmala) येथील गोकूळ संस्थेच्या चेअरमन संगीता लोंढे यांनी आक्षेप घेतला होता. नेत्यांच्या नावावर आणि गावांवर धावणे, आवताडे, लोंढे यांनी आक्षेपाच्या माध्यामातून बोट ठेवले. मतदार यादीसाठी प्रयत्न करणारी बचाव समिती दूध संघाच्या निवडणूक आखाड्यात उतरणार का? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोणत्या तालुक्‍यातील किती मतदार...

  • तालुका : पूर्वीचे मतदार : वाढलेले मतदार : एकूण मतदार

  • मंगळवेढा : 70 : 02 : 72

  • मोहोळ : 14 : 47 : 61

  • सांगोला : 33 : 01 : 34

  • माढा : 25 : 03 : 28

  • बार्शी : 27 : 01 : 28

  • अक्कलकोट : 07 : -- : 07 (आक्षेप मान्य झाल्याने एक मत कमी)

  • उत्तर सोलापूर : 17 : -- : 17

  • दक्षिण सोलापूर : 17 : -- : 17

  • पंढरपूर : 13 : -- : 13

  • करमाळा : 39 : -- : 39

  • एकूण : 262 : 54 : 316

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT