World Blood Donor Day 
सोलापूर

सात वर्षांपासून मोफत "ब्लड ऑन कॉल योजना'! शहीद अशोक कामटे संघटनेचा दीड हजार रुग्णांना लाभ 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेली मोफत "ब्लड ऑन कॉल' योजना सलग सात वर्षांपासून सुरू आहे. सात वर्षांत सांगोला, पंढरपूर, करमाळा, बार्शी, माळशिरस व अक्कलकोट तालुक्‍यातील 1428 रुग्णांनी याचा फायदा घेतला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक नीलकंठ शिंदे यांनी दिली. 

जागतिक रक्तदान दिनानिमित्त संघटनेचे संस्थापक श्री. शिंदे यांनी सांगितले, की शहीद अशोक कामटे संघटनेने रक्तदात्यांचा प्रवास खर्चही केला आहे. शंभर मोफत सेवा संघटनेने बजावल्यामुळे गतवर्षी देखील अनेक रक्तदाते स्वयंस्फूर्तीने तयार झाले आहेत. लाभ घेणाऱ्या रुग्ण व नातेवाइकांनी या उपक्रमाला धन्यवाद दिले आहेत. अनेक वेळा गरजू रुग्णांना गटातील रक्ताची गरज भासते, अशा वेळी आवश्‍यक असणाऱ्या गटाचे रक्त वेळेत मिळत नाही. त्यासाठी वेळ व पैसा फुकट वाया जातो, तोपर्यंत रुग्णाचा जीव टांगणीला लागलेला असतो. या सर्व बाबींचा विचार करून शहीद अशोक कामटे संघटनेने 2013 पासून ही मोफत रक्त पुरवठ्याची योजना आखली. 

रुग्णांनी फोन करताच मोफत रक्त पुरवठा येथील संस्थेच्या रक्तदात्यांनी केला आहे. गतवर्षी 389 पुरुष व 69 स्त्री रुग्णांनी याचा मोफत लाभ घेतला आहे. यामध्ये मंगळवेढा, करमाळा, मोहोळ, सांगोला येथील रुग्णांचा समावेश आहे. ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी चालू आहे. हा उपक्रम पाहून 1321 रक्तदाते स्वतःहून रक्त देण्यासाठी व विविध गटांचे 45 रक्तदाते प्रत्येक दिवशी हजर असतात. कॉल आला की तत्काळ नियोजित ठिकाणी पोचतात. त्यांचा जाण्या-येण्याचा खर्च शहीद अशोक कामटे संघटना करते. रुग्णांना संपूर्णपणे मोफत रक्त पुरवठा केला जातो. पंढरपूरसाठी एका तासात; माढा, करमाळासाठी तीन तासांत रक्तदाते नियोजित ठिकाणी पोच होतात. रक्तदात्यांकडून सरळ रक्त घेणे मोठे खर्चिक असते म्हणून शहीद अशोक कामटे संघटनेच्या सर्व सदस्यांनी ही योजना मांडली व ती गेल्या सात वर्षांपासून चांगल्या प्रकारे चालू आहे. 

24 तास सेवा उपलब्ध 
ज्या व्यक्तीला रक्ताची आवश्‍यकता आहे, त्यांनी 9423327241, 9403452950 या भ्रमणध्वनी क्रमांकावर 24 तास 365 दिवस संपर्क साधू शकता, असे आवाहन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kinder Joy: सावधान! किंडर जॉयमध्ये आढळले घातक बॅक्टेरिया; WHO सतर्क, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

BCCI Umpire Salary : खेळाडू तुपाशी पण अंपायर उपाशी! गेल्या ७ वर्षांपासून मानधन तेवढंच, अंपायरला एका सामन्याचे किती पैसे मिळतात?

Latest Marathi News Live Update : घंटागाडीतून निर्माल्याची विल्हेवाट! पालिका सहाय्यक आयुक्त विरोधात कारवाईची मनसेकडून मागणी

Sangli Municipal : ‘माझा प्रभाग, माझा अधिकार’च्या घोषणांनी भाजपमध्ये खळबळ; सांगलीत उमेदवारीवरून संघर्ष टोकाला

Kolhapur Muncipal : विकासाच्या नावाखाली टक्केवारीचा खेळ; कोल्हापूर शहराची घुसमट उघड चर्चेत

SCROLL FOR NEXT