veda raghu.jpg 
सोलापूर

वेडा राघूंच्या संख्येत यंदा लक्षणीय वाढ 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः यंदा झालेल्या भरपूर पावसाने भिजलेल्या शेती हंगामामुळे किटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या किटकांचे भक्ष्य करणाऱ्या वेडा राघू पक्ष्यांची संख्या यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात त्यांचे वास्तव यावेळी अधिक संख्येने झाले आहे. महिनाभरात या पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू होणार आहे. 

वेडा राघू, किवंडा पोपट, पाणपोपट असे विविध नामावळी असलेल्या वेडा राघू या पक्ष्यांचा मोठा वावर सोलापूर जिल्ह्यातील शेतशिवारात आढळत असल्याची माहिती पक्षी निरीक्षकांडून मिळाली आहे. भारतातील निवासी पक्षी असलेल्या वेडा राघूला इंग्रजीत ग्रीन बी ईटर असे म्हणतात. नीळकंठ, खंड्या व सुतार या पक्ष्यांच्या कुळातील पोपटी रंगाचे हे पक्षी सध्या विपुल प्रमाणात आढळून येत आहेत. 
सुडौल व सडपातळ शरीरयष्टी आणि शेपटीला असणारी मधली दोन दाभणासारखी पिसे हे वेडा राघू पक्ष्यांना ओळखण्याची खूण आहे. हे पक्षी भारतीय उपखंडात होणाऱ्या खाद्याच्या उपलब्धतेनुसार स्थलांतर करतात. पश्‍चिम महाराष्ट्रात एरवी अत्यल्प संख्येने वावराणारे वेडा राघू थंडीच्या काळात मात्र लक्षणीय संख्येने आढळून येतात. या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य मधमाशी आहे. मधमाशांबरोबर हे पक्षी टोळ, फुलपाखरे, पावसाळी किडे व इतर किटकांना पण आपले भक्ष्य ठरवतात. आपल्या अणुकुचिदार चोचीने हे पक्षी हवेतून उडणारे कीटक टिपण्यात तरबेज असतात. दिवसभर खाद्य मटकाऊन झाल्यानंतर शेकडोंच्या संख्येने मनुष्य वस्ती किंवा एखाद्या पाणवठ्याच्या जवळच्या डेरेदार झाडावर मुक्काम करतात. सकाळी अन्नाच्या शोधात विखरून जाण्याअगोदर काही काळाकरिता हे पक्षी विद्युत तारेवर बहुसंख्येने सूर्यस्नान घेण्यासाठी एकमेकांना बिलगून बसतानाचे दृश्‍य मनमोहक असते. 
हे पक्षी वैशिष्ट्यपूर्ण घरटे बनवतात. विणीच्या काळात (फेब्रुवारी ते मे) हे पक्षी जोडीने उघड्या जमीन वा टेकडी आणि वालूकामय जमीन इत्यादी ठिकाणी सामान्यपणे एक मीटर खोलीचा बोगदा तयार करतात. या बोगद्याच्या आतील टोकाला रूंद गोलाकार भाग तयार करतात. यात मादी चार ते सहा पांढरी शुभ्र लांब गोलाकाराच्या अंडी घालते. नर व मादी दोन्ही मिळून अंडी, पिल्लांची देखभाल करतात. या वर्षी झालेल्या चांगल्या पाउसामुळे जिल्ह्यात पिके जोमाने बहरल्याने किटकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. या किटकांवर ताव मारण्यासाठी वेडा राघू हे पक्षी थव्याच्या थवेने स्थलांतर करून आले आहेत. खरीप हंगाम संपल्यावर हे पक्षी जिकडे खाद्यान्न उपलब्ध होईल, तिकडे स्थलांतर करत निघून जातात. 

किटक व पक्ष्यांची जैव साखळी 
कडधान्यांची फुले ही रंगीत असल्याने तेथे कीटक अधिक आढळतात. तसेच पावसाळ्यात बहुतांश किटकांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. वेडा राघू पक्षी या किटकांना भक्ष्य करतो. 
-अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक, सोलापूर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik SIT Press: रुपाली चाकणकरांची चौकशी का नाही? नाशिकमध्ये एसआयटीची पत्रकार परिषद; तेजस्वी सातपुतेंचं स्पष्ट शब्दांत उत्तर

लासलगावच्या हापूसला ‘न्यूयॉर्क’ची हाक; भाभा अणुसंशोधन केंद्र विकिरण प्रक्रियेमुळे पहिल्यांदाच थेट अमेरिकेत निर्यात

IPL 2400 crore loss: आयपीएलला प्रत्येक वर्षाला २४०० कोटींचा फटका बसतोय, पण कसा? मोदीने गणित समजावून सांगितलं

Arshdeep Singh Girlfriend: अर्शदीप सिंगची गर्लफ्रेंड आहे 'ही' अभिनेत्री? एका टॅटूमुळे समोर आलं मिस्ट्री गर्लचं रहस्य, Viral Post

‘लाडकी विद्यार्थिनी’ योजना रखडली, दीड हजार मुलींचे भवितव्य नावाच्या वादात

SCROLL FOR NEXT