मोहम्मद अयाज गेले अनेक वर्षे संगीत व सामाजिक क्षेत्रामधे काम करत आहेत. आपल्या सोलापूर व देशाच नाव जग भरामध्ये लौकीक केलेले आहे.
सोलापूर : नुकतेच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितमध्ये महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज (singer mohammad ayaz) यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी खा. सुनील तटकरे, ग्रहनिर्माण मंत्री मा. जितेंद्र आव्हाड, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री मा. नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय सचिव मतीन कांबळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. (singer mohammad ayaz joins NCP)
मोहम्मद अयाज गेले अनेक वर्षे संगीत व सामाजिक क्षेत्रामधे काम करत आहेत. आपल्या सोलापूर व देशाच नाव जग भरामध्ये लौकीक केलेले आहे. त्यांना देश विदेशामधे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गले. अयाज सांगतात की, मी पक्षामध्ये राजकारण न करता एक समाजकारण करु इच्छितो, कारण सर्वप्रथम मी एक कलावंत आहे. मला सांस्कृतिक विभागामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेऊन जे काही मला संधी दिलेली आहे त्याचे सोनं करेन, कलाकारांचे प्रश्न असो किंवा सामाजिक प्रश्न त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करेन, मी स्वत:ला खरोखरच भाग्यवान समजतो की, एक कलावंताचा पक्ष प्रवेश एवढ्या मोठ्या लेवलवर जाईल आणि तेही त्यावेळी अनेक मंत्री महोदय उपस्थित, हे सर्व नक्कीच माझ्यावर व माझ्या कलेवर प्रेम दाखवले ही बाब माझ्यासाठीच नव्हे तर सोलापूरसाठी पण खूप आनंदाची बाब आहे.
मला विश्वास आहे, माझे सर्व सोलापूरकर व महाराष्ट्राचे रसिक गण माझ्या पाठीशी उभे नक्कीच राहतील. आणि मला समाजासाठी काही तरी चांगल काम करण्यासाठी चालना देतील, अशी मला खात्री आहे. आज मी एक गायक कलावंत म्हणून नावारुपास आलो, त्यात पत्रकार बंधू व संपूर्ण मीडिया ग्रुपचा सिंहाचा वाटा आहे. मला व माझ्या कलेस जगभरात पोहोचवणारे पत्रकार बंधुचा सदैव ऋणी आहे, अशी प्रतिक्रीया मोहम्मद अयाज यांनी दिली. (singer mohammad ayaz joins NCP)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.