solapur sakal
सोलापूर

Sinhgad Institutes : प्रा. मानसी नवले यांना बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक ; सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लिग २०२४

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड इन्स्टिट्यूट वतीने शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी "सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लिग २०२४" अंतर्गत पुणे व लोणावळा येथील सिंहगड कॅम्पस मध्ये क्रिकेट, बुद्धिबळ आणि टेबल टेनिस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

संजय हेगडे

तिसंगी : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड इन्स्टिट्यूट वतीने शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी "सिंहगड स्टाफ स्पोर्ट्स लिग २०२४" अंतर्गत पुणे व लोणावळा येथील सिंहगड कॅम्पस मध्ये क्रिकेट, बुद्धिबळ आणि टेबल टेनिस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कार्यरत असलेल्या प्रा मानसी सोमनाथ नवले यांनी बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक तर बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केलेची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

पुणे सिंहगड संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ व बॅडमिंटन स्पर्धेत सिंहगड संस्थेत व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतील कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बुद्धिबळ व बॅडमिंटन स्पर्धेत पंढरपूर सिंहगडच्या प्रा मानसी सोमनाथ नवले यांनी सुवर्णपदक व कांस्यपदक प्राप्त करून यश संपादन केले आहे.

प्रा मानसी नवले यांच्या यशाबद्दल काॅलेजचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, संस्थेत संचालक सोमनाथ नवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

यादरम्यान महाविद्यालयातील डाॅ. चेतन पिसे, काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. अनिल निकम, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोट, डाॅ. सोमनाथ कोळी, डाॅ. शिरीष कुलकर्णी आदींसह सह काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT