1Corona_91_0.jpg
1Corona_91_0.jpg 
सोलापूर

परिस्थिती सुधारतेय, नियम पाळा ! शहर- जिल्ह्यात आढळले 39 रुग्ण; चार तालुक्‍यांत एकही रुग्ण नाही

तात्या लांडगे

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील रुग्णसंख्या आज दिलासादायक असून एक हजार 735 संशयितांमध्ये 39 व्यक्‍ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 50 वर्षांवरील तीन पुरुषांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत शहरातील एक लाख 70 हजार 698 तर जिल्ह्यातील पाच लाख दोन हजार 605 संशयितांची टेस्ट करण्यात आली आहे. त्यात 52 हजार 488 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा रविवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचादेखील रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे.

चार तालुक्‍यात एकही रुग्ण नाही 
शहर- जिल्ह्याला आज दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातील अक्‍कलकोट, सांगोला, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या तालुक्‍यांमध्ये मंगळवारी (ता. 23) एकही रुग्ण आढळला नाही. बार्शी तालुक्‍यात दोन, करमाळा व मोहोळ तालुक्‍यात प्रत्येकी तीन, माढ्यात पाच, माळशिरसमध्ये सहा, मंगळवेढ्यात एक आणि पंढरपूर शहरात आठ रुग्ण आढळले आहेत. 

शहरात आज मोदीखाना, गुरुदेव दत्तनगर, फ्लोरा बिल्डिंग (जुळे सोलापूर), नरेंद्र नगर (सैफूल), एसआरपी कॅम्प (सोरेगाव), पाटील नगर (विजयपूर रोड), रामराज्य नगर (शेळगी), मुरारजी पेठ (पार्क चौकाजवळ) आणि भावना अपार्टमेंट (रेल्वे लाईन) या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाचा राज्यभर जोर वाढू लागल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभररकर, पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्‍त सूचना देत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत शहरातील 12 हजार 221 तर जिल्ह्यातील 40 हजार 267 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील एक हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT