Highway 
सोलापूर

"सोलापूर-रत्नागिरी' महामार्ग "एवढ्या' कोटींचा ! उड्डाणपुलासाठी एनजी मिलची जागा; पण...

तात्या लांडगे

सोलापूर : रत्नागिरी ते सोलापूर या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोलापुरातील भय्या चौक परिसरात उड्डाणपूल होणार असून, त्यासाठी एनजी मिलची जागा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाकडे मागणी केली असून, महामंडळाने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. कब्जा पावती मिळाल्यानंतर उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे. या महामार्गासाठी साडेसहा हजार कोटी रुपये मंजूर असून, काम पूर्ण होण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने एप्रिल 2021 पर्यंत मुदत दिली आहे. 

राज्यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण नव्या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना काळात लॉकडाउन असतानाही या महामार्गाचे काम टप्प्या-टप्प्याने सुरूच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून हा महामार्ग मंजूर झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगलीपर्यंत 56 किलोमीटरचा रस्ता आहे. या महामार्गासाठी चार हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तर भूसंपादनासाठी दोन हजार 500 कोटींचा खर्च झाला आहे. दरम्यान, सोलापुरातील भय्या चौक परिसरात मोठा उड्डाणपूल होणार आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात एनजी मिलची जागा आहे. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने महापालिकेच्या माध्यमातून ती जागा मागितली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने वस्त्रोद्योग महामंडळाकडे जागेची मागणी केल्यानंतर त्यास तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. कब्जा पावती मिळाल्यानंतर ती जागा उड्डाण पुलासाठी दिली जाईल, अशी माहिती नगर रचनेचे सहायक संचालक लक्ष्मण चलवादी यांनी दिली. 

ठळक बाबी... 

  • सोलापूर-रत्नागिरी महामार्ग एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल 
  • वस्त्रोद्योग महामंडळाकडून एनजी मिलची जागा मिळाल्यानंतर होणार भय्या चौकात उड्डाणपूल 
  • चौपदरी महामार्गासाठी साडेसहा हजार कोटींचा खर्च 
  • सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांना जोडणार हा महामार्ग 

याबाबत राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, सोलापूर-रत्नागिरी हा महामार्ग एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण होईल. लॉकडाउन असतानाही महामार्गाचे काम सुरू असून मुदतीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT