drain water in river pollution sakal
सोलापूर

Indrayani River : इंद्रायणीत दररोज सहा अब्ज लिटर दूषित पाणी; राष्ट्रीय हरित लवादाला माहिती

पिंपरी- चिंचवड महापालिकेसह सात विविध आस्थापनांकडून सहा अब्ज २० लाख लिटर प्रदूषित सांडपाणी रोज इंद्रायणी नदीत सोडले जाते.

रजनीश जोशी

सोलापूर - पिंपरी- चिंचवड महापालिकेसह सात विविध आस्थापनांकडून सहा अब्ज २० लाख लिटर प्रदूषित सांडपाणी रोज इंद्रायणी नदीत सोडले जाते, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला दिली.

तुळापूर येथे इंद्रायणी नदीचा भीमेशी संगम होतो.त्यामुळे हे सांडपाणी भीमेत मिसळते. तिथे गटारात रूपांतर झालेल्या भीमेचे पाणी पुढे उजनी धरणात पोचते. उजनी धरणातील पाणी सोलापूर, बार्शीसह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी पुरवले जाते.

इंद्रायणी नदीत सतत मिसळत असलेल्या प्रदूषित, प्रक्रिया न केलेल्या, घातक रासायनिक सांडपाण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादापुढे सुनावणी सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणाचे काम असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच लवादाकडे दिली.

गेल्या काही महिन्यांमध्ये नदीत विषारी फेस, प्रदूषित पाण्याचे प्रमाण खूप वाढले होते. राष्ट्रीय हरित लवादाने मार्च महिन्यात स्वतःहून या प्रकाराची दखल घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानंतर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी अशा सगळ्यांना याप्रकरणी उत्तर द्यावे लागणार आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

इंद्रायणीत मिसळणाऱ्या प्रक्रियारहित रासायनिक सांडपाण्याचे परिणाम सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना भोगावे लागतात. जलशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत गडबड झाल्यास आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

- अॅड. संजय कोकाटे, विधिज्ञ, बार्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT