karvai-1-1024x680.jpg 
सोलापूर

अबब ! सोलापुरात 14 हजार गुन्हे अन्‌ सव्वासहा हजार वाहने जप्त 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाला हद्दपार करण्याच्या हेतूने जाहीर केलेल्या लॉकडाउन व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 13 हजार 68 व्यक्तींविरुद्ध शहर पोलिसांनी मागील 19 दिवसांत गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, जप्त केलेली वाहने संपूर्ण लॉकडाउन उठल्याशिवाय सोडली जाणार नसून तत्पूर्वी संबंधित वाहनांवरील संपूर्ण दंड भरावा लागेल, असे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी स्पष्ट केले. तर ग्रामीण भागात एक हजार 800 जणांविरुध्द गुन्हे दाखल झाले असून चार हजार वाहने जप्त केल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 


सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांतर्गत 21 ठिकाणी नाकाबंदी केली असून सीमावर्ती भागात आठ ठिकाणी काटेकोरपणे वाहनांची तपासणी केली जात आहे. सकाळी सहा ते रात्री 11 वाजेपर्यंत पोलिसांचा त्या ठिकाणी पहारा आहे. सोलापूर अद्याप कोरोना या विषाणूच्या विळख्यात आलेले नसून नागरिकांनी खबरदारी घेतल्याचे पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी सांगितले. मात्र, काहीजण कारण नसताना तथा किरकोळ कारण असूनही घराबाहेर पडत आहेत. आता जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी वेळ निश्‍चित केली असून त्याच वेळेत नागरिकांनी भाजी अथवा किराणा वस्तू खरेदी करायच्या आहेत, असेही आयुक्‍त शिंदे यांनी स्पष्ट केले. विनाकारण घराबाहेर पडलेल्या व्यक्‍तींसह वाहनांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस आयुक्‍तांनी दिला. 


सोलापूरकरांनी करून दाखविले : सातत्य ठेवा 
राज्यभरात कोरोना या विषाणूचा विळखा वाढू लागला असतानाही, विशेषत: सोलापूरच्या सीमेवरील सर्वच जिल्ह्यांत कोरोनाबाधित रुग्ण आढळले असतानाही सोलापूर अद्याप कोरोनापासून चार हात लांबच आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे ठोस नियोजन अन्‌ नागरिकांनी घेतलेली खबरदारी, यामुळे ते शक्‍य झाले आहे. आणखी काही दिवस सोलापूरकरांनी त्यात सातत्य ठेवावे. 
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त 


पोलिस कारवाईतील मुद्दे... 

  • 19 दिवसांत 13 हजार 68 जणांनी मोडला संचारबंदी अन्‌ लॉकडाउनचा आदेश 
  • दोन हजार 147 दुचाकी, 168 रिक्षा तर 32 चारचाकी वाहने केली जप्त 
  • एक हजार 22 जणांकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन तर तिघांनी पसरविली अफवा 
  • लॉकडाउन अन सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नऊ हजार 596 जणांविरुद्ध गुन्हे 
  • जिल्ह्यातील अठराशे व्यक्‍तींविरुध्द गुन्हे अन्‌ तीन हजार आठशेहून अधिक वाहने जप्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT