Six two-wheelers found in a well in Karmala taluka but the mystery remains 
सोलापूर

करमाळा तालुक्‍यातील विहिरीत सापडल्या सहा दुचाकी; मात्र गूढ कायम 

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : गौंडरे (ता. करमाळा) येथील विहिरीत सहा मोटारसायकली टाकून दिल्याचे उघड झाले आहे. गुरुवार ता. 21 रोजी सकाळी हा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, चोरी झालेल्या मोटारसायकली विहिरीत का टाकल्या असतील याविषयी तालुक्‍यात चर्चा सुरू झाली आहे. हा प्रकार नेमका का, झाला असावा यांचा तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. 
गौंडरेपासून साधारणपणे अर्धा किलोमीटर अंतरावर आबा साळवे यांची विहिर आहे. या विहिरीला चांगल्या प्रकारे पाणी आहे. मात्र येथे लाईटची व्यवस्था नसल्याने इंजिनद्वारे पाणी उपसले जात होते. त्यामुळे विहिरीचे पाणीसाठा चांगला आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी आबा साळवे या शेतकऱ्यांने विहिरीवर विजेचे पोल टाकून इलेक्‍ट्रॉनिक मोटार बसवली. त्यानंतर विहिरीच्या पाण्याचा उपसा करणे सुरू झाले. गुरुवारी विहिरीच्या पाण्याचा उपसा होत आल्यानंतर तळाला सहा मोटारसायकली असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी हा प्रकार पोलिस पाटील प्रेरणा भास्कर अंबारे यांच्याकानावर घातला. त्यानंतर ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गेली दीड वर्षांपुर्वी एकाच महिन्यात या सहा मोटारसायकली गायब झालेल्या होत्या. विहिरीच्या तळाशी सहा मोटारसायकली सापडल्याने गावातून ज्यांच्या गेली वर्षभरात गायब झालेल्या मोटारसायकलीचे मालकांनी विहिरीकडे धाव घेतली आहे. मोटारसायकलींची चोरी करून विहिरीत टाकून दिल्याच्या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
यातील पाच मोटारसायकली गौंडरे गावातील महावीर कोपनर, अक्षय हनपुडे, पंडित हनपुडे, मारुती साळवे, पोपट माने यांच्या आहेत तर एक मोटारसायकल शेजारील आवाटी गावातील असल्याचे सांगितले जाते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT